solapur-muncipal_201911323895.jpg 
सोलापूर

शहरातील 17 ठिकाणी सापडला प्रत्येकी एक रुग्ण ! 'सिव्हिल' परिसरात अनोळखी महिलेचा मृत्यू 

तात्या लांडगे

 सोलापूर : शहरातील पाच हजार 765 पुरुषांना, चार हजार 11 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 362 पुरुषांचा आणि 181 महिलांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुसरीकडे आतापर्यंत शहरातील पाच हजार 136 पुरुषांनी आणि तीन हजार 660 महिलांनी कोरोनावर मात केली आहे. आज एक हजार 22 संशयितांची टेस्ट घेतली असून त्यात 17 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज नऊ पुरुष आणि सहा महिला बरे होऊन घरी परतल्या आहेत.

शहरासंबंधी ठळक बाबी... 

  • एक लाख तीन हजार 577 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • एकूण टेस्टपैकी 93 हजार 801 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह 
  • आतापर्यंत नऊ हजार 776 व्यक्‍ती सापडल्या कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरात आज आढळले 11 पुरुष, सहा महिला आढळल्या कोरोना बाधित 
  • सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील अनोळखी महिलेचा झाला कोरोनामुळे मृत्यू

शहरात आज कोंडा नगर (अक्‍कलकोट रोड), शिवाजी नगर (बाळे), बिलाल नगर (सैफूल), महाराणा प्रताप झोपडपट्टी (नई जिंदगी), सराफ कट्टा (मंगळवार पेठ), राजस्व नगर (विजयपूर रोड), सरस्वती विहार, जयजलाराम नगर (जुळे सोलापूर), अभिषेक पार्क (धम्मा वस्ती), देशमुख- पाटील वस्ती, मौलाना आझार चौक, बनशंकरी नगर (शेळगी), ढंगे रेसिडेन्सी, बुधवार पेठ, मिलन अपार्टमेंट (भवानी पेठ), तिऱ्हेगाव (फॉरेस्ट) आणि लक्ष्मीनारायण अपार्टमेंट याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, रुग्णांच्या संपर्कातील 28 हजार 575 संशयितांना आतापर्यंत होम क्‍वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी 28 हजार 483 व्यक्‍तींनी 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. तर इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमधील 14 हजार 338 पैकी 12 हजार 377 संशयित अद्याप इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. 23 जण होम आयसोलशेनमध्ये आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण तापलं; जैन समाजाच्या फसवणुकीचा आरोप, कारवाईची मागणी

Pune Crime: चाकणला गॅस टँकरमधून बेकायदा गॅस भरणा; तिघांना पोलिसांनी केली अटक, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार नुकसान, नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT