Ashadhi Wari 2024 sakal
सोलापूर

Ashadhi Wari 2024 : एक हजार बस धावणार थेट गावातून;आषाढी वारीसाठी पाच हजार गाड्या, शनिवारपासून बससेवा

आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एकूण पाच हजार बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यात ४० पेक्षा जास्त प्रवाशांनी बुकिंग केल्यानंतर थेट त्या गावांतून बसगाडी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एकूण पाच हजार बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यात ४० पेक्षा जास्त प्रवाशांनी बुकिंग केल्यानंतर थेट त्या गावांतून बसगाडी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यानुसार एक हजार ३० गाड्यांचे बुकिंग झाले असून त्या बस आता वारकऱ्यांच्या गावांतून थेट पंढरीत येणार आहेत.

श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीचा सोहळा १७ जुलैला पंढरीत रंगणार आहे. त्यानिमित्ताने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. श्री श्रेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवासी येतात. अनेक प्रवासी स्वत:च्या खासगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात, या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. भाविक प्रवाशांची संख्या ४० पेक्षा जास्त असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अर्थात या प्रवासात देखील ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ४,२४५ विशेष बस सोडल्या होत्या. यंदा पाच हजार गाड्या सोडण्यात येणार आहेत.

बस स्थानकाचे नाव जिल्हानिहाय सोडण्यात बस

चंद्रभागा बसस्थानक मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार

भीमा यात्रा देगाव छत्रपती संभाजी नगर , नागपूर व अमरावती प्रदेश

विठ्ठल कारखाना नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

पांडुरंग बसस्थानक सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

१२ ते १५ लाख वारकरी येण्याचा अंदाज

आषाढी वारीसाठी यंदा महाराष्ट्रासह परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. पोलिसांच्या अंदाजानुसार यंदाच्या आषाढी सोहळ्यासाठी तब्बल १२ ते १५ लाख भाविक येतील. त्यानुसार पंढरीत १२ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT