onion market.jpg sakal
सोलापूर

कांदा लिलाव १३, १४ अन्‌ १५ जानेवारीला बंद! प्रतिक्विंटल सरासरी १४०० तर उच्चांकी दर २५०० रुपये

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोलापूर बाजार समितीस तीन दिवस सुटी असणार आहे. १३ जानेवारीला बाजार समिती सुरु राहील, पण कांदा लिलाव होणार नाही. तसेच १४ व १५ जानेवारीला बाजार समिती बंद राहणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोलापूर बाजार समितीस तीन दिवस सुटी असणार आहे. १३ जानेवारीला बाजार समिती सुरु राहील, पण कांदा लिलाव होणार नाही. तसेच १४ व १५ जानेवारीला बाजार समिती बंद राहणार आहे. त्यासंबंधीचा अंतिम निर्णय बाजार समिती पुढील आठवड्यात जाहीर करेल.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच श्री सिद्धेश्वरांची यात्रा उत्साहात साजरी होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने देवस्थान पंच कमिटीतर्फे सर्व नियोजन झाले असून होम मैदानावर मनोरंजनाची दुकाने थाटली जात आहेत. दरम्यान, सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दररोज सकाळी दहा वाजता कांद्याचे लिलाव सुरु होतात. रात्री दहा वाजल्यानंतर शेतकऱ्यांची वाहने बाजार समितीत सोडली जातात. कांद्याचे दर अजूनही स्थिरच असून प्रतिक्विंटल अडीच हजार रुपयांचा दर मिळत आहे.

राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत सोलापूर बाजार समितीत कांद्याला चांगला दर मिळतोय, असे बाजार समितीतील अधिकारी सांगतात. दक्षिणेतील व्यापारी आपल्याकडील कांदा मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. पंचगंगा कांदा हा टिकाऊ व दर्जेदार असल्याने त्याला दक्षिणेत मोठी मागणी आहे. त्यामुळे दर स्थिर असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोलापूर बाजार समितीतील कांदा लिलाव १३ ते १५ जानेवारीला होणार नाहीत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरासरी दर १०० रुपयांनी घसरले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. ६) ५०६ गाड्यांची आवक होती. सोलापूरसह बीड, उस्मानाबाद, पुणे, नाशिक, कर्नाटकातून कांदा बाजार समितीत येत आहे. शुक्रवारी कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार ५०० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. सरासरी दर मागील काही दिवस दीड हजार रुपये होता. पण, सरासरी दर १०० रुपयाने कमी झाला आहे. कांदा आवक वाढल्याने दर वाढत नसल्याची स्थिती आहे. काही दिवसांत दर वाढतील, हा बळीराजाला विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT