Siddheshwar 
सोलापूर

अक्षता सोहळ्यासाठी 50 मानकऱ्यांनाच प्रवेश ! नंदीध्वज वाहनातून थेट संमती कट्ट्याजवळ; विभागीय आयुक्‍तांकडे प्रस्ताव

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप दूर झाले नसून, आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळला आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांची यात्रा साधेपणानेच साजरी केली जावी, अक्षता सोहळ्यासाठी मानकऱ्यांनाच परवानगी असावी, आषाढी वारीदरम्यान पालख्या ज्या पध्दतीने पांडूरंगापर्यंत आणल्या, त्या धर्तीवर नंदीध्वज मिरवणूक रद्द करुन मानाचे सात नंदीध्वज थेट संमती कट्ट्याजवळ वाहनातून आणावेत, असा प्रस्ताव विभागीय आयुक्‍तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर तीन-चार दिवसांत निर्णय अपेक्षित असून, मंगळवारी (ता. 22) यांसदर्भात पुन्हा बैठक होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्‍तांकडून होईल लवरकच निर्णय
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेस गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. यात्रा समिती व लोकप्रतिनिधींची मागणी, महापालिका आणि पोलिस प्रशासनाचा अभिप्राय घेऊन विभागीय आयुक्‍तांकडे मागील आठवड्यात प्रस्ताव पाठविला आहे. दोन-चार दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. 
-मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी


ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेसाठी मानकऱ्यांसह मोजक्‍याच किमान एक हजार व्यक्‍तींना परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती, तर आमदार संजय शिंदे यांनी सात मानाच्या नंदीध्वज मिरवणुकीसाठी प्रत्येकी 25 भाविकांना परवानगी द्यावी, नंदीध्वज मार्गांवर 144 कलम लागू करावा, अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांना निवेदन दिले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने यात्रेसंबंधीचा निर्णय विभागीय आयुक्‍त व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविला आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 16 डिसेंबरला विभागीय आयुक्‍तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. तत्पूर्वी, यात्रेसाठी गर्दी होऊ नये, सोलापूर शहर- जिल्ह्यातील मृत्यूदर अपेक्षेप्रमाणे कमी झालेला नसून रुग्णसंख्याही कमी-अधिक होत आहे, असा अभिप्राय शहर पोलिसांनी दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


आमदार प्रणिती, संजय शिंदे यांचा पाठपुरावा
श्री सिध्दरामेश्‍वर यात्रेनिमित्ताने धार्मिक विधी परंपरेनुसार करण्यास परवानगी द्यावी, नंदीध्वज मिरवणुकीस परवानगी द्यावी, मानकऱ्यांसह एक हजार व्यक्‍तींना परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. दुसरीकडे राज्याच्या सचिवांकडे पाठपुरावा करुन फाईल मुख्यमंत्र्यांकडे स्वाक्षरीसाठी गेली आहे. आम्ही केलेला पाठपुरावा यशस्वी झाला असून मागणी मान्य झाल्याचेही आमदार प्रणिती यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मात्र,  तसे काहीच झाले नसून आता नवा प्रस्ताव प्रशासनाने केल्याने नेमकी आमदार प्रणिती शिंदे यांची कोणती मागणी मान्य झाली, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, सात नंदीध्वज मिरवणुकीत प्रत्येकी शंभर नंदीध्वजधारक असावेत, त्यांच्याशिवाय तीनशे भाविकांना अक्षता सोहळ्यासाठी परवानगी मिळावी, असा प्रस्ताव आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: कोण होणार भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष? उमेदवारी दाखल केलेले नितीन नवीन नेमके कोण? उद्या घोषणा

Latest Marathi News Live Update : ठाकरे गटाकडून नगरसेवकांना उद्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश, अनुपस्थित राहिल्यास कारवाईचा इशारा

Malegaon Mayor Post Update: मालेगाव महापौर पदासाठी हालचालींना वेग; ‘ISLAM’ पार्टीची ‘या’ पक्षाशी सुरू चर्चा

RBI New Rules: क्रेडिट स्कोअर, क्रेडिट कार्ड, कर्ज प्रीपेमेंट अन् बँक खाते... आरबीआयचे नवे नियम लागू; थेट परिणाम खिशावर

Parbhani Accident : जिंतूर–औंढा मार्गावर भीषण अपघात; दोन वाहनांच्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी!

SCROLL FOR NEXT