ITR Farmers 
सोलापूर

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील अपात्र लाभार्थी, आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून 40 टक्केच वसुली !

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आयकर भरणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांकडून आतापर्यंत 5450 शेतकऱ्यांकडून 5 कोटी 36 लाख 34 हजार इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. उद्दिष्टाच्या केवळ 40.72 टक्केच वसुली झाली आहे. 7 कोटींच्या वसुलीसाठी प्रशासनाकडून बॅंकेला थेट कळविण्यात आले आहे. 

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेच्या पोर्टलवर 1 मार्च अखेर 6 लाख 26 हजार 998 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली असून, त्यामध्ये 13 हजार 557 आयकर भरणाऱ्या पात्र लाभार्थींनी 13 कोटी 16 लाख 98 हजार रुपये इतका लाभ मिळवल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामध्ये 8107 शेतकऱ्यांकडून अद्यापही 7 कोटी 80 लाख 64 हजार रुपये इतकी वसुली बाकी आहे. त्यासाठी प्रशासनाकडून बॅंकांना पत्रव्यवहार करण्यात आला असून, या लाभ घेतलेल्या अपात्र लाभार्थींच्या खात्यातून ते पैसे शासनाला परत पाठवण्यात यावेत; अन्यथा त्यांचे अकाउंट फ्रीज करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्यामुळे अपात्र लाभार्थींचे बॅंक खाते फ्रीझ होण्यामुळे खळबळ उडाली आहे. 

1 मार्चपर्यंत सर्वांत जास्त येणे बाकी सांगोला तालुक्‍यात असून सर्वांत कमी येणे बाकी उत्तर सोलापूर तालुक्‍यामध्ये आहे. 

तालुकानिहाय शेतकरी, वसूल रक्कम व कंसात येणे बाकी रक्कम 

  • अक्कलकोट : 1076 : 33 लाख 98 हजार (67,22,000) 
  • बार्शी : 1525 : 38 लाख 68 हजार (1 कोटी 12 लाख 2 हजार) 
  • करमाळा : 1359 : 59 लाख 56 हजार (66 लाख 24 हजार) 
  • माढा : 1284 : 67 लाख 40 हजार (55 लाख 44 हजार) 
  • माळशिरस : 2049, 1 कोटी 4 लाख 56 हजार (98 लाख 96 हजार) 
  • मंगळवेढा : 733 : 33 लाख 40 हजार (37 लाख 46 हजार) 
  • मोहोळ : 1016 : 60 लाख 22 हजार (39 लाख 30 हजार) 
  • पंढरपूर : 1665 : 89 लाख 70 हजार (70 लाख 48 हजार) 
  • सांगोला : 1565 : 12 लाख 36 हजार (1 कोटी 42 लाख 8 हजार) 
  • उत्तर सोलापूर : 435 : 21 लाख 74 हजार (18 लाख 14 हजार) 
  • दक्षिण सोलापूर : 850 : 4 लाख 74 हजार (73 लाख 30 हजार) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT