dr venketesh metan.jpg 
सोलापूर

ताणतणावाच्या व्यवस्थापनावरच आव्हान पेलणे शक्‍य ; डाॅ.व्यंकटेश मेतन यांचे मत

प्रकाश सनपूरकर


सोलापूर, ः विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यात ताणतणावाचे व्यवस्थापन केल्यास जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जाणे शक्‍य होऊ शकते, असे मत युथ होस्टेलचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी व्यक्त  केले. 
सी. बी. खेडगी महाविद्यालय अक्कलकोट, संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंद्रूप यांच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या अँटी रॅगिंग अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर युनिटच्या वतीने व्यवस्थापन रॅगिंग व मानसिक तणावाचे व्यवस्थापन या विषयावर ऑनलाइन वेबिनार घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. 
स्वातंत्र्यपूर्व काळापासून रॅगिंगच्या घटना देश व विदेशात होत आहेत. याबाबत देशातदेखील अनेक प्रकारचे कायदे केले आहेत. परंतु कायद्याने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी शासनाकडून जनजागृती उपक्रम राबवण्याची कायम गरज असते. केंद्र शासनाने कायद्यात कठोर शिक्षेची तरतूदही केली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी पालक व शिक्षकांना वेळीच सांगण्याची सवय केली पाहिजे. म्हणजे संभव्य मोठ्या संकटातून त्यांची सुटका होऊ शकते असे डॉ. मेतन यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बधाले यांनी केले. संध्या इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी डॉ. प्रा. अंधारे, प्रा. बाबाराव सुरवसे यांनी परिश्रम घेतले. 

स्वत:चे चारित्र्य विकसित करा 
स्वतःचे चारित्र्य विकसित करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी जपले पाहिजे. त्यासाठी आदर्श व्यक्तींचे चरित्र वाचण्याची सवय केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी महापुरुषांच्या जीवनातील प्रसंग, आलेल्या संकटावरील मात करण्याची हातोटी यावर विश्‍लेषण केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

Sambhaji Maharaj Descendants : शंभूराजांच्या आजोळ घराण्याचे वंशज काय करतात? छत्रपतींशी पिढ्यानपिढ्या जपले आहे रक्ताचे नाते

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

SCROLL FOR NEXT