Open sand theft from Chandrabhaga again 
सोलापूर

चंद्रभागेतून पुन्हा खुलेआम वाळू चोरी

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात महसूल आणि पोलिस यंत्रणा व्यस्त असल्याचा गैरफायदा वाळू माफिया घेत आहेत. सध्या येथील चंद्रभागा नदीपात्रातून खुलेआम वाळू चोरी होत आहे. वाळू चोरीसाठी गाढवे आणि होडीचा वापर होत आहे. 


बेसुमार वाळू उपशाने नदीपात्रात खड्डे निर्माण झाले आहेत. हेच खड्डे पाणी आल्यानंतर वारकऱ्यांच्या जीवावर बेतण्याची भीती देखील यानिमित्त व्यक्त केली जात आहे. मागील तीन महिन्यांपासून कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून चंद्रभागा नदीपात्रातून वाळू चोरी थांबली होती. मागील आठ दिवसांपासून काही प्रमाणात लॉकडाउन शिथिल करण्यात आले आहे. त्याचा फायदा घेत वाळू चोर पुन्हा सक्रिय झाले आहेत. 


चंद्रभागा नदीपात्रातून दररोज पहाटेच्या सुमारे गाढवाद्वारे वाळूची चोरी होत आहे. याशिवाय रेल्वे पुलाजवळून होडीच्या साहाय्याने वाळू चोरी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी भटुंबरे, सुस्ते, अजनसोंड, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला येथे वाळू चोरी विरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतरही पुन्हा शेगाव दुमाला, भटुंबरे, शिरढोण, इसबावी येथील नदीपात्रातून राजरोस वाळू चोरी करून नदीकाठच्या भागात वाळूचे साठे केले आहेत. 


लॉकडाउन काळात सर्वच वाहनांची तपासणी केली जाते. तरीही रात्रीच्या वेळी वाहनातून वाळू वाहतूक कशी होते, याविषयी स्थानिक नागरिक चर्चा करत आहेत. 

वाळू चोरीवरून वाद वाढण्याचे चिन्ह 
वाढत्या वाळू चोरीमुळे नदीकाठच्या अनेक गावांत पुन्हा वाळू उपसा आणि वाहतुकीच्या कारणावरून वाद होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. वेळीच पोलिस आणि महसूल प्रशासनाने वाळू चोरी विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT