Opened in Akkalkot All shops 
सोलापूर

अक्कलकोटमध्ये उघडली सर्वच दुकाने

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट : अक्कलकोट शहरात ग्राहकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पूर्वी घेतलेला सम व विषम पद्धतीने दुकाने उघडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. उद्यापासून येथील सर्वच दुकाने उघडली जाणार आहेत. 


अक्कलकोटला सम, विषम नियमाप्रमाणे दुकाने उघडून व्यवहार सुरू झाला खरा, पण त्याने गर्दी नियंत्रित करता येत नाही असे कारण देत जुना अडत बाजार परिसरात सर्व दुकाने बंद केली गेली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भेट घेऊन आपली अडचण त्यांना सांगितली. त्यानंतर तहसीलदार अंजली मरोड, मुख्याधिकारी आशा राऊत यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून सम, विषम पद्धतीने दुकाने उघडण्याचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे आज दुपारी सर्वच दुकाने उघडण्यात आली. 

दरम्यान, उद्यापासून आता शहरात बंदी असलेली दुकाने सोडून इतर सर्वच प्रकारची दुकाने सकाळी सात ते दोन यावेळेत उघडली जाणार आहेत. अक्कलकोटमधील सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी व कोरोनापासून चार हात लांब राहण्यासाठी प्रशासनाने 17 मुद्यांची नवी अधिसूचना जारी केली आहे. ते सर्व मुद्दे पाहिले तर येथे गर्दी जमून सर्व नियमांचा फज्जा उडताना दिसत होते. सर्वसामान्य नागरिकही गर्दी पाहून भयभीत झालेले दिसत आहेत. आजच्या कोरोनामुक्तीचा आनंद कायम राहावा यासाठी व्यवस्थित प्रयत्न होताना दिसत नाहीत. पोलिस प्रशासनाने सलग तीन महिने नागरिकांना सांगूनही काहीच फरक पडताना दिसत नाही. यामुळे पोलिस प्रशासनही हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या गर्दीमुळे अनलॉक एक हे कोरोनासाठी लाभदायक की हानिकारक ठरणार, हे येत्या पंधरवड्यात स्पष्ट होणार आहे.


आज अक्कलकोटमध्ये दुकाने उघडल्यानंतर भाजीपाला मार्केट व इतर बाजारात झालेली गर्दी पहिली असता येथील नागरिक चार लॉकडाउनमधून काही शिकले असतील असे वाटले नाही. ना भय, ना भीती, ना कोरोनाची चिंता, असे आज दिसून आले. आता यापुढे असेच हे चालू राहिले तर येत्या काळात कोरोना वाढू लागल्यास आश्‍चर्य वाटू नये. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT