solapur janta bank.jpg 
सोलापूर

पूर्व भागातील उडता किंवा गुंडला यांना संधीची शक्‍यता : सोलापूर जनता बॅंक निवडणूक

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर :  सोलापूर जनता सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पूर्व भागाला दोन जागा देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी आहे. पण शेवटी जागा किती द्यायच्या, याचा फैसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार आहे. विश्वसनीय माहितीनुसार पूर्व भागातून पुरुषोत्तम उडता किंवा सत्यनारायण गुंडला यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
या बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे. सध्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याकरिता एक मार्च ही अंतिम मुदत आहे. दरम्यान संघाकडून इच्छुकांसमवेत चर्चा केली जात आहे. काहींना माघार घेण्यास सांगण्यात आले आहे. पूर्व भागातील ज्या लोकांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यामध्ये पुरुषोत्तम उडता, सत्यनारायण गुंडला, श्रीहरी म्याकल, अंबादास बिंगी, दयानंद मामड्याल, नागेंद्र रव्वा, राजू कुडक्‍याल, व्यंकटेश गज्जम, श्रीनिवास गाजूल आदींचा समावेश आहे. अर्ज भरलेल्यांशी 
संघाकडून संपर्क साधून चर्चा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये काहींना अर्ज माघार घेण्याविषयी सांगण्यात आले आहे. पूर्व भागातील विविध घटकांनी अर्ज भरला आहे. यामध्ये उद्योजकांचाही समावेश आहे. 

उद्योजकाला महामंडळावर घेण्याची हमी 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जो उद्योजक उमेदवार म्हणून हवा आहे, अशा व्यक्तीस विचारणा झाली खरी. पण ती व्यक्ती बॅंकेची सभासद नसल्याचे आढळून आले. सभासद असलेल्या व उमेदवारी अर्ज भरलेल्या एका उद्योजकास तुम्हाला शासकीय महामंडळावर संधी देऊ, असे आश्वासन देऊन निवडणुकीतून माघार घ्या, असे सांगण्यात आल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसात माघार प्रक्रियेला वेग येणार आहे. निवडणुकीचे खरे चित्र 1 मार्च रोजी स्पष्ट होणार आहे.  


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Noida Tourism: मोदींनी एअरपोर्ट सुरू करताच तरुणाई सुसाट! विकेंडला फिरायला 'या' ४ ठिकाणांना मिळतेय पहिली पसंती

Hanuman Jayanti 2026: यंदा हनुमान जयंती 1 की 2 एप्रिलला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजाविधी

US-Iran Conflict : "नरकात तुमचं स्वागत, सैन्य पाठवाल तर बनेल कब्रस्तान; इराणचा अमेरिकेला थेट इशारा

Vardha News: भीषण अपघातात एक ठार, दोघे जखमी; कोसुर्ला शिवारातील घटना : ट्रिपल सीट बाईकला टिप्परने कट मारल्याने अपघात

Yavatmal News:१० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन; आढावा बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT