Nandini Milk Price Hike : नंदिनी दूध प्रतिलिटर ४ ते ५ रुपयांनी महागणार? सध्याचा ४६ रुपयांचा दर ५०-५१ रुपयांवर जाण्याची शक्यता

Nandini Milk Price May Rise by ₹4 to ₹5 Per Litre : कर्नाटकातील १६ जिल्हा सहकारी दूध संघांच्या मागणीनंतर नंदिनी दुधाच्या दरात प्रतिलिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
Nandini Milk Price Hike

Nandini Milk Price Hike

esakal

Updated on: 

बंगळूर : राज्यातील १६ जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांच्या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नंदिनी दुधाच्या दरात लिटरमागे ४ ते ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. कर्नाटक दूध महासंघाच्या (केएमएफ) उद्या (ता. २५) होणाऱ्या बैठकीनंतर दरवाढीबाबत अधिकृत प्रस्ताव सरकारकडे पाठविला जाणार असून त्यानंतर नवीन दराची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

दुधाच्या दरवाढीसंदर्भात अधिकृत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्य सहकारी दूध उत्पादक महासंघाला दिल्याचे समजते. त्यानुसार उद्याच्या केएमएफच्या बैठकीत दरवाढीच्या प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाईल.

उत्पादक संघांनी दूध विक्रीच्या दरात लिटरमागे ८ ते १० रुपये, तसेच दूध उत्पादकांना मिळणारे प्रोत्साहन धन आठ रुपयांनी वाढविण्याची मागणी केली होती. यासाठी राज्यातील विविध भागांत शेतकऱ्यांनी आंदोलनही केले. बंगळूरच्या फ्रीडम पार्कसह तुमकूर जिल्ह्यातील मधुगिरी, चिक्कबळ्ळापूर आदी ठिकाणी निदर्शने केली.

Nandini Milk Price Hike
Maharashtra Drought Subcommittee : बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना नऊ मंत्र्यांसह मुख्य सचिवांचा समावेश

दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून, पशुखाद्याच्या कच्च्या मालासह मका आणि कडब्याच्या दरात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दूध खरेदी दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे दूध उत्पादक संघांचे म्हणणे आहे.

Nandini Milk Price Hike
Kundal Wrestling Mahakumbh : कुंडल येथे रविवारी कुस्तीचा महाकुंभ देशभरातील आंतरराष्ट्रीय मल्ल भिडणार

नंदिनी दुधाच्या दरात यापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये लिटरमागे चार रुपयांची वाढ केली होती. सध्या नंदिनी दुधाचा दर ४६ रुपये प्रतिलिटर आहे. प्रस्तावित वाढ लागू झाल्यास तो ५० किंवा ५१ रुपये प्रतिलिटर होण्याची शक्यता आहे. दरवाढीतून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेतून ७० टक्के हिस्सा दूध उत्पादकांना, तर ३० टक्के हिस्सा दूध संघांना देण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जाते. पशुखाद्य, चारा, वाहतूक आणि पॅकेजिंगच्या वाढत्या खर्चामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचा दावा दूध संघांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com