Chale Agitation 
सोलापूर

भाजप आंदोलनाची पंढरपुरातून सुरवात ! चळेत "वीज वितरण'च्या विरोधात विरोधी पक्षनेते दरेकरांचे आंदोलन 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने शेती पंपाची वीज तोडणी मोहीम सुरू केली आहे. या विरोधात आज (शुक्रवारी) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पंढरपूर तालुक्‍यातील चळे येथे आंदोलन केले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करत वीज बिल माफ करावे, अशी मागणी केली. 

वीज वितरण कंपनीने पंढरपूर तालुक्‍यातील चळे येथील सुमारे 100 हून अधिक शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यानंतर आज प्रवीण दरेकर यांनी चळे गावाला भेट देऊन येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

राज्य सरकारने वीज तोडणी मोहीम बंद करावी; अन्यथा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची आमच्याशी गाठ आहे, असा गर्भित इशाराही श्री. दरेकर यांनी दिला. सरकारने शेती पंपाची वीज तोडणी मोहीम बंद करावी. जबरदस्तीने वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची वीज तोडू दिली जाणार आहे. यासाठी मी स्वतःवर गुन्हा घ्यायला देखील तयार आहे. आंदोलनाची सुरवात आज मी चळे गावातून केल्याचेही श्री. दरेकर यांनी या वेळी सांगितले. 

आंदोलना दरम्यान येथील शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. 

या वेळी पांडुरंग साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, लक्षमण धनवडे, विक्रम शिरसट, बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष घोडके आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT