Ban On Liquor Sale Sakal
सोलापूर

Ban On Liquor Sale : पंढरपूर परिसरात १५ ते १९ जुलै दरम्यान मद्य विक्री बंदचे आदेश

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रानिमित्त पंढरपुर शहर व परिसरात १५ ते १९ जुलै दरम्यान मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रानिमित्त पंढरपुर शहर व परिसरात १५ ते १९ जुलै दरम्यान मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून ५ कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद राहणार आहेत.

तसेच २० व २१ जुलैला पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून पाच किलो मीटर त्रिज्या परिसरातील सर्व देशी व विदेशी मद्य विक्री, व ताडी दुकाने सायंकाळी ५ पासून बंद राहणार आहेत. आषाढी एकादशी पंढरपूर यात्रानिमित्त संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी (गावात/शहरात) सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने गुरूवारी (ता.११) नातेपुते,

शुक्रवारी (ता.१२) माळशिरस व अकलूज, शनिवारी (ता.१३) वेळापूर, बोरगांव ,श्रीपूर माळीनगर, रविवारी (ता. १४) भंडीशेगाव, पिराची कुरोली व सोमवारी (ता.१५) वाखरी येथे पूर्ण दिवस मद्य विक्री बंद राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT