PI Padule 
सोलापूर

गुन्हे घडल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही ! करमाळ्याचे पोलिस निरीक्षक पाडुळे यांचा इशारा 

नाना पठाडे

पोथरे (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत गावातील वाद - विवाद टाळण्यासाठी व गावाचा विकास होण्यासाठी गावातील सर्व पक्षांनी एकत्रित बसून ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी प्राधान्याने विचार करावा. तसेच गावात दखलपात्र गुन्हे होऊ नयेत यासाठी पक्षप्रमुखांनी काळजी घ्यावी व याला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. जर गुन्हा घडल्यास कुणाचीही गय न करता संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अस इशारा करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिला. 

करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. या अनुषंगाने पोथरे (ता. करमाळा) येथे कायदेविषयक सूचना देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे बोलत होते. पुढे बोलताना पोलिस निरीक्षक श्री. पाडुळे म्हणाले, निवडणूक कालावधीत मत - मतांतरे व वादविवाद होऊन दखलपात्र गुन्हे घडण्याची शक्‍यता असते. असे झाले तर कुणाचीही गय न करता संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच गावाचा विकास करण्यासाठी गावातील सर्व पक्षप्रमुखांनी एकत्रित बसून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्राधान्याने विचार करावा. याशिवाय 26 जानेवारीपर्यंत गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. 

या वेळी ऍड. नानासाहेब शिंदे व बबन जाधव यांनी गावात आचारसंहिता कालावधीत आपापसांत वादविवाद होणार नाहीत यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. बिट अंमलदार अनिल निंबाळकर, पोलिस पाटील संदीप शिंदे - पाटील उपस्थित होते. या वेळी गावातील सर्व आजी - माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोथरे गावचे पोलिस पाटील संदीप शिंदे - पाटील प्रास्ताविक करून आभार मानले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT