मराठा आरक्षण esakal
सोलापूर

Osmanabad : आंदोलनाच्या निमित्ताने एकवटतोय ‘मराठा’

परंड्यात ८ नोव्हेंबरला एल्गार : गावोगावी बैठका, जय्यत तयारी सुरू

सकाळ डिजिटल टीम

परंडा : मराठा समाजाचा आरक्षण महामोर्चा ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठीची तयारी शिस्तबद्ध सुरू आहे. मोर्चासाठी तालुका समन्वय समितीने दहा टिम कार्यरत केल्या असून प्रत्येक टिम मधील सदस्य प्रत्येक दिवशी एकाच वेळी दोन गावात जातात. ज्या गावी जायचे त्याची कल्पना दोन दिवस अगोदर ग्रामस्थांना दिली जाते.

प्रचार फेरीमध्ये कोणताही डामडौल सत्कार स्विकारला जात नाही. गावच्या सार्वजनिक ठिकाणी मंदिर, सभागृह येथे तरुण, वृद्ध, महिला, सर्व गावातील कार्यकर्ते एकत्र बसतात. कोण मोठा नाही, कोण छोटा नाही अशी भावना सर्वामध्ये असते. मराठा आरक्षण प्रचार समिती टीम ग्रामस्थांशी संवाद साधताना सकल मराठा समाज शेती, व्यवसाय, नोकरी या क्षेत्रातील समस्या आणि सुधारणा, मुलींचे शिक्षण, उपजीवेकेची साधने यावर चर्चा करत भावकी कलह, बांधावरील भांडणे आपल्या विकासात कशी अडसर ठरली हे समजावून सांगतात.

महिला शिक्षणात मागे पडल्या परंड्यात उच्च शिक्षण सोय नव्हती. दळण वळण साधने नव्हती. निजाम राजवट, मोगलाईच्या अधिपत्याखाली असणारा मराठा बांधव स्वांतत्र्यानंतर प्रथमच एकवटला जात आहे. प्रत्येक जण आत्मचिंतन करत आहे. मोर्चाला येताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची जबाबदारी गावातील तरुण स्विकारत आहेत. स्वखर्चाने शिस्तबद्धरित्या परंडा जाण्याचे नियोजन सर्वजण करत आहे.

घरोघरी प्रचार दौरे घेण्यात पुरुषांबरोबर महिलाही आघाडीवर आहेत. गावोगावचे तरूण राजकारणात विस्कटलेली मन जोडण्यात गुतंले आहेत. याचा सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसणार आहे. या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्यातील गावे तर सहभागी होणार आहेतच पण करमाळा, बार्शी, माढा, जामखेड इ शेजारील तालुक्यातील मराठा बांधव ही सहभागासाठी उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे.

सर्व जातीधर्माचे योगदान

सर्व जाती धर्माचे लोक या साठी योगदान देत आहेत. एकंदरीत ग्रामीण चळवळ विकासासाठी आसुसली असल्याचे चित्र निर्माण होत असुन महाराष्ट्रात चांगला संदेश जाणार असल्याचे सद्यस्थितीत वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT