CORONA.jpg 
सोलापूर

प्रभाग 10 रेड झोनमधून बाहेर ! नगरसेवकांना मिळाले "प्रथमे'श; आता उरले अवघे सात रुग्ण 

तात्या लांडगे

सोलापूर : हातावरील पोट असलेल्या नागरिकांचा सर्वाधिक समावेश असलेला दहा नंबरचा प्रभाग. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर झोपडपट्टीसह गोरगरीब वस्त्यांमध्ये या विषाणूचा संसर्ग वाढेल, अशी भीती होती. मात्र, या प्रभागातील पहिल्यांदाच निवडून आलेले नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेविका सावित्री सामल, मीराबाई गुर्रम या तीन नव्या दमाच्या नगरसेवकांसह विठ्ठल कोठा यांनी एकत्रित येऊन या प्रभागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळवले. आता हा प्रभाग रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये आला आहे. सध्या या प्रभागात अवघे सात रुग्ण उरले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

शहरातील कोंडा नगर, कल्याण नगर, धनलक्ष्मी नगर, सत्यसाई नगर, विडी घरकुल, गडगी नगर, सोनिया नगर अशा भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती होती. मात्र, सुरुवातीच्या काळात या प्रभागातील 21 जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यानंतर मात्र, या प्रभागातील नगरसेवकांनी घरोघरी जाऊन जनजागृतीच्या माध्यमातून मृतांची संख्या रोखण्यात यश मिळवले. या प्रभागातील सुमारे 25 हजार नागरिकांचे घरोघरी जाऊन थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. दुसरीकडे प्रभागातील चारही नगरसेवकांनी रॅपिड अँटीजेन टेस्टवर भर देत जागोजागी मोहीम घेतली. विडी घरकुलसारख्या परिसरामध्ये विडी वळून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या भागातील नागरिक कोरोना काळात सुरक्षित राहावेत, त्यांना उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडायला लागू नये म्हणून नगरसेवकांनी गरजूंना घरोघरी धान्य वाटप केले. तसेच या भागातील छोटे-मोठे उद्योजक व व्यापाऱ्यांचीही टेस्ट करून घेण्यात आली. तर प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मास्क, व्हिटॅमिनच्या गोळ्याही घरपोच देण्यात आल्या. त्यामुळे सर्वाधिक गोरगरिबांची लोकवस्ती असलेला हा प्रभाग सर्वात कमी कोरोना बाधित असलेल्या प्रभागांमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिला आहे. 


प्रभागाविषयक ठळक बाबी... 

  • - आत्तापर्यंत आढळले 207 रुग्ण 
  • - एकूण रुग्णांपैकी 179 झाले बरे 
  • - प्रभागात आत्तापर्यंत 21 जणांचा मृत्यू 
  • - सद्यस्थितीत उरले अवघे सात रुग्ण 

या प्रभगाचे नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी सांगितले की शहरात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम प्रभागातील सुमारे 25 हजार नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रभागातील तरुणांच्या सहकार्यातून घरोघरी जाऊन जनजागृतीवर भर दिला. रॅपिड अँटीजेन टेस्टवर भर देत गरजूंना घरोघरी धान्य, मास्कसह अत्यावशक वस्तूंचे वाटप केले. 

या प्रभागातील नगरसेविका सावित्री सामल यांनी सांगितले की, प्रभागातील छोटे-मोठे व्यापारी, 60 वर्षांवरील नागरिक व व को-मोर्बिड रुग्णांवर कायम वॉच ठेवला. प्रभागातील लोक कोरोनाचे बळी ठरू नयेत म्हणून घरोघरी जनजागृती केली. नगरसेवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करीत घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे कोरोना खुप वाढला नाही. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT