School  sakal
सोलापूर

२०-४० टक्क्यांवरील शिक्षकांचा नोकरी वाचविण्यासाठी आक्रोश! ‘माध्यमिक’मध्ये गर्दी; अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावले

टप्पा अनुदान मिळाले, परंतु तुमची ऑर्डरच बोगस असल्याचा मेसेज माध्यमिक शिक्षण विभागाकडून गेल्याने झेडपीत शिक्षकांची व शिक्षक नेत्यांची गर्दी वाढली. शाळेला अनुदान मिळाले, आता नोकरी टिकविण्यासाठी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या भोवती गिरट्या घालायला सुरुवात केली आहे.

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दहा- वीस वर्षे फुकट काम केल्यानंतर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना आता कुठे टप्पा अनुदान मिळाले आहे. टप्पा अनुदान मिळाले परंतु तुमची ऑर्डरच (नियुक्ती आदेश) बोगस असल्याचा मेसेज माध्यमिक शिक्षण विभागाकडून गेल्याने शुक्रवारी (ता. ३१) झेडपीच्या माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षकांची व शिक्षक नेत्यांची गर्दी वाढली होती. शाळेला अनुदान मिळाले आता नोकरी टिकविण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या भोवती गिरट्या घालायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना बोलावून ती गर्दी हटवावी लागली.

जिल्ह्यातील २२ शाळा व १३२ तुकड्या ४० व ६० टक्के अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. तर २१४ शाळा २० टक्के अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. वर्षानुवर्षे शिक्षकांनी शाळा अनुदानीत होण्याची वाट पाहिली. शाळा अनुदानित झाल्याचा आनंद मावण्यापूर्वीच जिल्ह्यातील जवळपास ६० शिक्षकांच्या नियुक्ती आदेशावर माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी बोट ठेवत या शिक्षकांचे वेतन थांबविले आहे. शाळा अनुदानित झाली परंतु आपली नोकरीच धोक्यात आल्याची जबरदस्त भीती शिक्षकांमध्ये पसरल्याने गेल्या तीन दिवसांपासून शिक्षकांची माध्यमिक शिक्षण विभागात अक्षरशः झुंबड उडाली आहे.

अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे आदेश काढण्याचा आज अंमित दिवस होता. आज शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची गर्दी कमी होत नसल्याने शेवटी पोलिस माध्यमिक शिक्षण कार्यालयात आले होते. विधान परिषदेचे शिक्षकचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी देखील माध्यमिक शिक्षण विभागात तातडीने येत माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्यासोबत बराच वेळ बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे अनेक शिक्षकांना ताटकळत थांबावे लागले.

‘माध्यमिक’च्या शिक्षणाधिकारी वठारे यांनी काढलेल्या काही त्रुटी इतक्या गंभीर आहेत की, काही शिक्षकांना रडू कोसळले. पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथील महादेवराव शिंदे प्रशालेतील तिघा शिक्षकांचा पगार थांबविला आहे. शिक्षिका रुक्मिणी वाकडे म्हणाल्या, 20 टक्के अनुदानावेळी मंत्रालयीन स्तरावर आम्ही पात्र ठरलो. आता शाळेला अनुदान ४० टक्के मिळाल्यावर आमचा नियुक्ती आदेश बोगस असल्याचे सांगितले जात आहे.

उपसंचालक कार्यालयाच्या पडताळणीनंतर वेतनाचा निर्णय

माध्यमिक शिक्षण विभागातून यापूर्वी काही चुकीच्या मान्यता दिल्या गेल्या असल्याचे माझ्या पाहणीत समोर आले आहे. ज्या मान्यतांची कागदपत्र उपलब्ध नाहीत अशा 50 ते 60 प्रकरणांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे या शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन तात्पुरत्या स्वरूपात थांबविले गेले आहे. उपसंचालक कार्यालयाकडून पडताळणी झाल्यानंतर ज्यांच्या मान्यता योग्य आहेत त्यांचे वेतन पूर्ववत केले जाणार आहे.

- सुलभा वठारे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण, सोलापूर

कार्यालयाबाहेर काम करू नये; नेहरू वस्तीगृहाला कुलूप

माध्यमिक शिक्षण विभागाबाबत येत असलेल्या तक्रारींवर शिक्षण आयुक्त व उपसंचालक यांना आज कळविण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षण विभागा संदर्भात असलेल्या तक्रारीं संदर्भात सोमवारी (ता. ३) या विभागाची बैठक मी बोलविली आहे. जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांनी कार्यालयात बसूनच काम करावे. कार्यालयाच्या बाहेर कोणीही काम करू नये, अशा सक्त सूचना आज दिल्या आहेत. नेहरू वस्तीगृहाला कुलूप लावण्यात आले आहे.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament canteen: संसदेच्या कँटीनमध्ये किती रुपयांना मिळतं जेवण? विविध पदार्थांचे दर काय? व्हेज-नॉनव्हेज थाळ्यांच्याही किंमती वाढल्या

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Mumbai News: जुहू समुद्रकिनाऱ्यावर यांत्रिक जाळी, सागरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

Latest Marathi News Live Update : खड्डे अपघातात जीव गमावलेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांचं महापौरांनी केलं सांत्वन

Pachod News : नांदरमध्ये २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली; परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT