31Corona_20akola_2001_1_3.jpg 
सोलापूर

शहरात 60 वर्षांवरील तिघांचा मृत्यू ! रुग्णसंख्या 9847 तर मृत्यू पाचशेच्या उंबरठ्यावर

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे बंद करण्यात आला असून मृतांची संख्या पुन्हा वाढू लागल्याची चिंता आहे. सणासुदीनिमित्त बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली असतानाही त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काहीच उपाययोजना केल्याचे दिसत नाही. आज शहरातील एक हजार 42 संशयितांमध्ये 26 जण पॉझिटिव्ह आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. विजयपूर रोडवरील उत्कर्ष नगरातील 70 वर्षीय महिला, द्वारीका येथील 82 वर्षीय महिला आणि होटगी रोडवरील पाटील नगरातील 60 वर्षीय पुरुषाचा त्यात समावेश आहे.

ठळक बाबी...

  • आतापर्यंत शहरातील एक लाख सहा हजार 975 संशयितांची कोरोना टेस्ट
  • शहरात आढळले आतापर्यंत नऊ हजार 847 कोरोना पॉझिटिव्ह
  • एकूण रुग्णांपैकी 548 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी
  • आठ हजार 865 रुग्णांची कोरोनावर मात; सध्या 434 रुग्ण रुग्णालयात
  • आज एक हजार 42 टेस्टमध्ये 26 पॉझिटिव्ह; 60 वर्षांवरील तीन को- मॉर्बिड रुग्णांचा मृत्यू

शहरात आज दक्षिण सदर बझार, मंजुनाथ नगर (लिमयेवाडी), रामलिंग नगर (विजयपूर रोड), नवी पेठ, ओंकार सोसायटी (मजरेवाडी), पाटील नगर (सैफूल), साईलक्ष्मी विहार, श्रध्दा अपार्टमेंट (भवानी पेठ), तिऱ्हेगाव (फॉरेस्ट), विशाल नगर, आनंद नगर (जुळे सोलापूर), कुलकर्णी अपार्टमेंट (अक्‍कलकोट रोड), विजय देशमुख नगर, सेटलमेंट कॉलनी क्र. दोन, विद्या नगर, मित्र नगर (शेळगी), मुरारजी पेठ, देशमुख- पाटील वस्ती (आमराई), भागवत टॉकिजजवळ, रेसिडेन्स क्‍वार्टरस, सोलापूर कारागृह आणि सिध्देश्‍वर पेठ येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. ऍक्‍टिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 94 संशयित होम क्‍वारंटाईन असून 55 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 18 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यंत शहरातील पाच हजार 813 पुरुषांना तर चार हजार 34 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे आतापर्यंत 364 पुरुषांचा आणि 184 महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT