over gandhi jayanti prahar janshakti party protest for various demand solapur sakal
सोलापूर

Solapur News : प्रशासनाच्या चालढकलीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे आत्मक्लेश आंदोलन

विविध प्रश्नांवर वारंवार आंदोलन करूनही प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्रस्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीपासून प्रांतकार्यालयासमोर स्वतः ला गाढून घेत आत्मक्लेश आंदोलन सुरु केले.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : विविध प्रश्नांवर वारंवार आंदोलन करूनही प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्रस्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीपासून प्रांतकार्यालयासमोर स्वतः ला गाढून घेत आत्मक्लेश आंदोलन सुरु केले.

या मागण्यामध्ये नंदेश्वर येथील महिला स्वाती गरंडे यांना घराकडे जाण्यासाठी रस्त्याची मागणी केल्यावर 13 सप्टेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालयाकडून चलन भरुन बंदोबस्त घेण्याचे आदेश येवुन देखील चलन भरण्यात आलेले नाही, सदर महिलेला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम सुरु आहे.चलन भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवक तसेच विस्तार अधिकारी नरळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

तालुक्यातील दुध उत्पादकांना 10 जानेवारी ते 11 मार्च पर्यंत चे दोन महिन्याचे अनुदान हँटसन , सोनाई , डोडला तसेच इतर खाजगी संस्था कडून कागदपत्रांची पुर्तता करुन देखील खात्यात जमा करण्यात आले नसल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, दंडात्मक कारवाई करत, अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.

विमा कंपनीकडून सन 2023--24 रोजी तुर उत्पादकांची करण्यात आलेली लुट तात्काळ थांबवावी तसेच त्यांनी भरलेल्या विम्याच्या रक्कमेप्रमाणे त्यांना विमा देण्यात यावा.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्यावरती खड्डे पडले आहेत ते खड्डे तात्काळ भरून घ्यावेत.

तसेच नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान झालेल्या नागरिकांना चार महिने झाले अजून भरपाई मिळाले नाही.त्यासाठी महसूल विभागाने 24 सप्टेंबर पर्यत खात्यावर रक्कम सोडण्याचे आश्वासन देण्यात आले, परंतु अद्याप ही त्यांना भरपाई देण्यात आलेली नाही ती तात्काळ द्यावी. या सर्व मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT