money 
सोलापूर

लॉकडाउनच्या अडथळ्यांवर मात करत  खरिपासाठी कर्जवाटप करण्यास बॅंकांची धडपड 

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन, संचारबंदी अशा विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांचे पालन करून शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्जपुरवठा करण्यात बॅंकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. 1 ते 31 मे या कालावधीत जिल्ह्यात 15.40 टक्के कर्जवाटप झाले आहे. यंदाच्या खरिपासाठी एक लाख नऊ हजार 472 शेतकऱ्यांना एक हजार 438 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टापोटी 15.40 टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने 22 हजार 81 शेतकऱ्यांना, पब्लिक सेक्‍टरमधील बॅंकांनी 69 हजार 505 शेतकऱ्यांना, प्रायव्हेट सेक्‍टरमधील बॅंकांनी 10 हजार 605 शेतकऱ्यांना तर विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने सात हजार 281 शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी 31 मेपर्यंत 18 हजार 496 शेतकऱ्यांना 221 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून विविध बॅंका कर्जवाटपाचे काम करत आहेत. जून महिन्यात मोठ्या प्रमाणात कर्जवाटप होत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे या महिन्यात कर्जवाटपाचे आकडे निश्‍चित सुधारतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT