Oxypark 
सोलापूर

आता सर्वांनाच खायला मिळणार वळसंग पोलिस ठाण्याची शुद्ध "हवा' ! 

श्याम जोशी

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : "एकदा पोलिस ठाण्याची हवा खायला पाठवू काय?' असा सज्जड दम अनेकजणांकडून आपण ऐकतो. परंतु, ती "हवा' एखाद्या गुन्ह्याच्या संबंधात असली तरी वळसंग पोलिसांनी ठाण्याच्या परिसरात सर्वांनाच शुद्ध हवा मिळावी, यासाठी एक अभिनव प्रयोग राबवला आहे. येथील "हवा' खायला आता खरंच सर्वांना आवडण्यासाठी पोलिसांकडून ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे "ऑक्‍सिपार्क' साकारले आहे. 

पोलिस ठाणे लोकाभिमुख करतानाच नागरिकांशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करत वळसंग पोलिसांनी वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टर चालकांच्या संवादातून केलेला उपक्रम थेट गृहमंत्र्यांकडून वाखाणला गेल्याने पोलिसांचा उत्साह दुणावला आहे. आता "ऑक्‍सिपार्क' उपक्रमामुळे पुन्हा राज्य पातळीवर वळसंग ठाण्याचे नाव पोचणार आहे. पोलिस ठाण्याबद्दल नागरिकांमध्ये असलेला गैरसमज दूर व्हावा व पोलिस ठाणे लोकाभिमुख व्हावे, यासाठीचे प्रयत्न अविरत सुरू आहेत. त्याचबरोबर पोलिस ठाण्याचा परिसर निसर्गरम्य, हिरवागार तसेच स्वच्छ असावा, यासाठी आता विशेष उपक्रम राबवले जात आहेत. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या ऑक्‍सिपार्क संकल्पनेला साद देत वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी पोलिस कर्मचारी व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून वळसंग पोलिस ठाण्याच्या आवारात ऑक्‍सिपार्क साकारले आहे. 

येथील पोलिस ठाण्याच्या आवारात मागील महिन्यापर्यंत जप्त केलेली चारचाकी व दुचाकी वाहने अस्ताव्यस्त होती. आवारात काटेरी झाडाझुडपांनी परिसर अस्वच्छ झाला होता. पोलिस ठाण्याची दोन हेक्‍टर 93 आर. इतकी जमीन असून, तिची दुरवस्था झाली होती. या सर्वांवर एक स्वच्छतेचा हात फिरणे गरजेचे होते. त्यानुसार येथील पदभार घेतल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले यांनी स्वच्छतेस सुरवात केली. त्यास पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी साथ देत ऑक्‍सिपार्क उपक्रमाबाबत योग्य त्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिस ठाण्याच्या आवारात 500 मीटर लांबीचे वॉकिंग ट्रॅकही तयार करण्यात आले आहे.

गुरुवारी (ता. 10) पोलिस अधीक्षक सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या उपस्थितीत ऑक्‍सिजन निर्माण करणारी 70 झाडे लावण्यात आली आहेत. या पार्कच्या निर्मितीसाठी माढा येथील इन्स्पायर फाउंडेशनचे अजय शहा यांनी विशेष मदत केली आहे. हुतात्मा जलसंवर्धन समितीचे अध्यक्ष दिनकर नारायणकर, सादिक पटेल, श्रीकांत कलशेट्टी व ब्राइट ऍकॅडमीचे जावेद पटेल, उमेश चौगुले, लक्ष्मण नवटक्‍के, अमोल म्हेत्रे, सागर रोट्टे यांचे सहकार्य लाभले. ऑक्‍सिपार्क बनविण्यामध्ये वळसंगचे मुस्ताक शेख, कुंभारीचे सचिन झगळघंटे यांच्यासह पोलिस हवालदार सूर्यकांत बिराजदार, श्रीनिवास दासरी, पोलिस नाईक अमोल यादव, शहाजहान शेख, शरद चव्हाण, काळजे यांचे विशेष सहकार्य लाभले. हे ऑक्‍सिपार्क वळसंग व परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांना मिळणार असल्याचे पोलिस अधीक्षक सातपुते यांनी घोषित केले. 

जनता व पोलिस यांच्या सहकार्याने तयार केलेल्या ऑक्‍सिपार्कचा लाभ वळसंग गावातील महिला, ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा. पोलिस कर्मचारी व जनतेचे आरोग्य यामुळे निश्‍चितच चांगले राहील. 
- तेजस्वी सातपुते,
पोलिस अधीक्षक, सोलापूर 

महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील पहिले ऑक्‍सिपार्क पोलिस स्टेशन तयार करण्याचा मान वळसंगला मिळाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले व हुतात्मा जलसंवर्धन समितीचा हा वळसंग पॅटर्न सर्वत्र अमलात आणला जाईल, अशी आशा आहे. 
- महादेव होटकर,
माजी सरपंच, वळसंग 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT