Bird Flu. 
सोलापूर

बर्ड फ्लूसदृश आजाराने चित्रबलाक पक्ष्यांचा मृत्यू ! उपरीत सलग दुसऱ्या दिवशीही पडले पक्षी मृत्युमुखी

मोहन काळे

रोपळे बुद्रूक : उपरी (ता. पंढरपूर) परिसरात काल सलग दुसऱ्या दिवशीही स्थानिक स्थलांतरीत चित्रबलाक नावाचे पक्षी मृत्युमुखी पडल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. बर्ड फ्लूसदृश आजाराचा जिल्ह्यात शिरकाव झाल्यामुळे गावात आता भीतीचे वातावरण पसरले आहे. पंढरपूर - सातारा रस्त्यावरील उपरीतील कासाळ ओढ्याकाठी ही घटना घडली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्‍यातील काही गावांमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. मंगळवेढा तालुक्‍याच्या शेजारीच असलेल्या पंढरपूर तालुक्‍यातील उपरी गावात बुधवारपासून स्थलांतर करणारा रंगीत करकोचा म्हणजे चित्रबलाक ज्याला इंग्रजीत पेन्टेड स्टॉर्क म्हणून ओळखतात, हे पक्षी सलग दुसऱ्या दिवशीही मृत्युमुखी पडल्याचे काही ग्रामस्थांना आढळून आले. मात्र, या पक्ष्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, बर्ड फ्लूच्या साथीमुळे गावकऱ्यांनी या पक्ष्याजवळ जाणे टाळण्याची गरज आहे. 

कासाळ ओढ्यातील पाणथळावर सध्या चित्रबलाक पक्ष्यांचा वावर वाढला आहे. असे असताना कासाळ ओढ्यावर चित्रबलाक पक्षी मृत्युमुखी पडू लागल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

चित्रबलाक पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कदाचित या पक्ष्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेही झालेला असू शकतो, म्हणून गावकऱ्यांनी या मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांजवळ जाण्याचे टाळावे, असे आवाहन गावकऱ्यांना करण्यात येत आहे. 

बुधवारपासून आम्हाला कासाळ ओढ्यावर पक्षी मरून पडल्याचे दिसत आहेत. मात्र यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. 
- महेश नागणे, 
ग्रामपंचायत सदस्य, उपरी, ता. पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT