Panchayat Raj Committee Complaints of various departments in Mohol Kailas Patil solapur  sakal
सोलापूर

"पंचायत राज समिती समोर मोहोळ तालुक्यातील विविध विभागांच्या तक्रारींचा पाऊस"

सर्व तक्रारींची सचिव पातळीवर चौकशी लावु - पंचायत राज समिती चे पथक प्रमुख आमदार कैलास पाटील

राजकुमार शहा

मोहोळ : मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत, त्यात विहिरींच्या तक्रारींचे प्रमाण जास्त आहे ,या तक्रारीचे स्वरुप पाहता गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत, अनेक बाबींचे खुलासे मागवले आहेत, समाधानकारक खुलासे न मिळाल्यास या सर्व तक्रारींची सचिव पातळीवर चौकशी लावु अशी माहिती पंचायत राज समिती चे पथक प्रमुख आमदार कैलास पाटील यांनी पत्रकारांना दिली. गुरुवार ता 16 रोजी पंचायत राज समितीने मोहोळ पंचायत समिती चा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारींची निवेदने मोठ्या प्रमाणात दिली.

आमदार पाटील यांनी एका शाखा अभियंत्याला विहिरीच्या तक्रारी बाबत विचारणा केली असता त्याने चौकशी करून सांगतो असे उत्तर देऊन वेळ मारून नेली. मोहोळ पंचायत समितीने कोविड च्या काळात चांगले काम केले आहे, उद्दिष्टापेक्षा काही कामे चांगली झाली आहेत. जुन्या काळातील अनेक तक्रारी आहेत त्यांचा खुलासा मागवला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगीतले. भाजपचे संजीव खिलारी यांनी डोंबारी समाजाला सोयी-सुविधा मिळत नाहीत त्याबाबत पंचायत राज समितीला निवेदन दिले. सामाजिक कार्यकर्ते दशरथ काळे यांनी मोहोळ पंचायत समिती मार्फत झालेल्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी करावी, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमावा, अनेक वर्षानुवर्षे पंचायत समितीमध्ये विस्ताराधिकारी तळ ठोकून बसले आहेत त्यांच्या बदल्या कराव्यात, रोजगार हमी, शौचालय, घरकुल ,यातील अपहाराची चौकशी करावी, विस्ताराधिकारी तळ ठोकून असल्याने एजंटांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे एजंटा शिवाय सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, याची चौकशी करावी असे निवेदन काळे यांनी दिले आहे.

यावेळी त्यांना काही पत्रकारांनी आपल्या स्वागतासाठी वेलवेट अंथरले आहे हे आपण इथं आहे पर्यंतच राहणार की कायमस्वरूपी राहणार असे विचारले असता आमदार पाटील यांनी आम्ही कामकाजाची चौकशी करण्यासाठी आलो आहोत आम्हाला वेलवेट अपेक्षित नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार कैलास पाटील, यांच्यासह आमदार विजय रहांगडाले, आमदार माधव पवार, आमदार किशोर जोरगेवार, दत्तात्रेय बैगामवार विधिमंडळ अधिकारी, ज्ञानेश्वर चौधरी प्रतिवेधक विधिमंडळ, अमरसिंह पवार मुख्य लेखाधिकारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आनंद मिरगणे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीनिवास पद्मावार, यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख त्यांचे सहकारी कर्मचारी उपस्थित होते. गेल्या दोन दिवसापासून विविध विभागाचे अधिकारी पंचायत राज समिती आल्यावर आपली चौकशी होते की काय याबाबत तणावाखाली होते मात्र बैठक संपताच त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT