Panchayat Raj Samiti visit Vikram Kale Gathered 3 crore by giving target solapur  sakal
सोलापूर

पंचायत राज समिती दौरा : तीन कोटींचा आकडा ऐकताच कानाला हात

सोलापूर : सदस्य काळे म्हणाले, आमच्या नावावर तिकीट फाडले असेल

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आम्ही ज्या ज्या जिल्ह्यात जातो, त्या ठिकाणी आम्ही आमची व्यवस्था अमूक ठिकाणी करा, आम्हाला हे हवे, असे आम्ही कधीच सांगत नाही. आमच्या नावावर जर कोणी पैसे गोळा केले असतील, तर ते कठीणच आहे. आम्ही काहीच सांगितले नसताना आमच्या नावाने कोणी तिकीट फाडत असेल, तर ते चुकीचे आहे, असे स्पष्टीकरण पंचायत राज समितीचे सदस्य आमदार विक्रम काळे यांनी दिले. तुमची समिती सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहे, म्हटल्यावर जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना टार्गेट देऊन तीन कोटी रुपये गोळा केली असल्याची चर्चा सुरू आहे, या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नांवर काळे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

समिती सदस्य काळे यांनी स्वतःचे हात कानावर लावत ‘हे ऐकायला किती बरं वाटतंय’, असे म्हणत ‘आम्ही अनेक जिल्ह्यांत जातो, मात्र असे करायला कोणालाच सांगत नाही. आमच्या नावावर पावती फाडली जात असेल तर चुकीचे आहे’, असे काळे यांनी निक्षून सांगितले. पंचायत राज समिती ज्या जिल्ह्यात जाते, त्या जिल्हा परिषदेला समिती सदस्यांच्या वाहन, भोजन, निवास आदीच्या व्यवस्थेसाठी निधी खर्च करण्याची मुभा राज्य सरकार देत असते, त्यामुळे वेगळा निधी गोळा करण्याची आवश्यकता नाही, असेही काळे यांनी सांगितले. ते म्हणाले की, समितीच्या नावावर गोळा करण्यात येणाऱ्या पैशाबाबतचे कुठेही पुरावे अथवा नोंद नसते, त्यामुळे त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही.

आम्ही ज्या ज्या जिल्ह्यात जातो, त्या ठिकाणी सरकारी निधी वेळेत खर्च होतो की नाही, हे पाहतो. यंत्रणा सर्वसामन्यांसाठी काम करते की नाही, हे पाहणे आमच्यासाठी प्राधान्याचे असते. विधान मंडळाच्या पंचायत राज समितीच्या सोलापूर जिल्हा परिषद दौऱ्याचा आज समारोप झाला. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात चेअरमन संजय रायमूलकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात काळे यांना याबाबत छेडण्यात आले असता त्यांनी वरील भाष्य केले. या प्रसंगी समितीचे सदस्य अनिल पाटील, कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT