logo 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समित्या शनिवारी, रविवारी राहणार सुरु, झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांचा आदेश 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामांना अधिक गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका पंचायत समित्या शनिवारी (ता. 2) व रविवारी (ता. 3) सुरु ठेवण्याचे आदेश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना आज दिले आहेत. 

या योजनेचे नियोजन करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी सर्व तालुका पंचायत समित्यांची कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्‍याचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, बांधकाम, लघुपाटबंधारे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांनी या दोन्ही दिवशी आपल्याशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कार्यालयात उपस्थित राहण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी केली आहे. 

सर्व यंत्रणांनी या दोन्ही दिवशी समन्वय करून या योजनेची कामे जिल्ह्यात सुरू करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. या दोन्ही दिवशी केलेल्या कामाचा अहवाल आपल्याला व्हाट्‌सअपद्वारे सोमवारी (ता. 4) दुपारी 12 पर्यंत सादर करावा अशी स्पष्ट सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी आज केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT