Pandhari's Vithuraya will be set up 24 hours from Wednesday 
सोलापूर

पंढरीचा विठुराया बुधवारपासून उभारणार 24 तास

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : कोरोनामुळे आषाढी यात्रा भरणार नसली तरी भक्तांचा लाडका विठुराया 24 तास उभा राहणार आहे. भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येणार नाही. तथापि परंपरेनुसार देवाचा पलंग मात्र बुधवारी काढण्यात येणार असून विठुरायाला टेकण्यास मऊ कापसाचा लोड तर श्री रुक्‍मिणी मातेस मऊ कापसाचा तक्‍क्‍या ठेवण्यात येणार आहे. 


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी 30 जूनपर्यंत बंद असेल. तथापि श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे नित्योपचार हे परंपरेनुसार सुरू आहेत. दरवर्षी आषाढी यात्रा कालावधीत श्रींचे 24 तास दर्शन सुरू असते व हा नित्योपचाराचा भाग असल्याने बुधवार 24 जूनला सकाळी सात वाजता देवाचा पलंग काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. 

आषाढी यात्रा ही आषाढ शुद्ध 1 ते पौर्णिमेपर्यंत भरते. यंदा 1 जुलैला आषाढी एकादशी असून पौर्णिमा 5 जुलैला आहे. आषाढ शुद्ध 3 बुधवारी सकाळी सात वाजता श्रींचा पलंग काढला जाईल. आषाढी यात्रा काळात जास्तीत जास्त भाविकांचे दर्शन व्हावे यासाठी श्री विठ्ठल व रुक्‍मिणी माता 24 तास उभेच असतात. प्रथेनुसार श्री विठुरायाला टेकण्यास मऊ कापसाचा लोड तर श्री रुक्‍मिणी मातेस मऊ कापसाचा तक्‍क्‍या दिला जाणार आहे. या कालावधीत पहाटे चार ते पाच दरम्यान श्रींची नित्यपूजा, सकाळी 10:45 ते 11:15 या कालावधीत महानैवेद्य, रात्रौ साडेआठ ते नऊच्या दरम्यान लिंबूपाणी असे नित्योपचार होणार आहेत. 


श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी देवाचे सर्व नित्योपचार हे नेहमीप्रमाणेच पार पाडले जात आहेत. याच अंतर्गत आता आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना दर्शनासाठी मंदिरात जाता येणार नसले तरी नित्योपचार परंपरेप्रमाणे केले जाणार आहेत. आषाढीतील देवाचे 24 तास दर्शन हा नित्योपचारातील भाग आहे. श्रीचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू आहेत. 


श्री विठ्ठलाचे लाइव्ह दर्शन 

  • श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर तसेच खासगी कंपनीच्या सेवेद्वारे श्रींचे लाइव्ह दर्शन 24 तास उपलब्ध आहे. तसेच "श्री विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्था' या मोबाईल ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. सदरचे मोबाईल ऍप गुगल अपस्टोअरवर "श्री विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्था' या नावाने मोफत उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

Coastal Road Accident: BMW फ्लायओव्हरवरून खाली कशी कोसळली? धक्कादायक घटनेचा CCTV व्हायरल

UPI Transaction Fee : ऑनलाइन व्यवहारांना लागणार ब्रेक? केंद्र सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना बसणार लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड, UPI शुल्क बदलामुळं वाढली चिंता

SMRITI MANDHANA: सुजी बेट्सला मागे टाकलं अन् स्मृती मंधानाने रचला इतिहास! महिला T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली

Vastu Benefits of Shankh: घरात शंख ठेवण्याचे 'हे' आहेत फायदे; वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या शंखाचा योग्य प्रकार अन् दिशा!

SCROLL FOR NEXT