Accident News  esakal
सोलापूर

Pandharpur Accident : अंत्यविधी उरकून परतणाऱ्या गर्दीत घुसला ट्रक! तिघींचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

पंढरपूर : अंत्यविधी उरकून घराकडे परत येणाऱ्या जमावामध्ये ट्रक घुसून झालेल्या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना पंढरपूरपासून जवळ असलेल्या टेंभुर्णी रोडवरील टाकळी पुनर्वसन गावानजीक रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसा गुनदेव गुटाळ यांचे शुक्रवारी रात्री मृत्यू झाला होता. त्यामुळे हे सर्व नातेवाईक अत्यंविधीसाठी गेले होते. मात्र रात्री उशिरा अत्यंतविधी उरकून सर्वजण घराकडे परत येत असताना अचानक टेंभुर्णीहून पंढरपूर कडे येणारा मालवाहू ट्रक गर्दीत घुसला.

या भीषण अपघातामध्ये मयताच्या दोन‌ सुनांसह तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. यामध्ये हिराबाई भारत गुटाळ (वय 35) मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय 40 ) यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या मयत महिलेचे नाव समजू शकले नाही. दरम्यान या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT