B. P. Ronge 
सोलापूर

डॉ. रोंगे म्हणाले, "पंढरपूर-मंगळवेढा तालुक्‍याला हवे अभ्यासपूर्ण नेतृत्व ! त्यासाठीच भाजपकडून मी इच्छुक'

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : अलीकडच्या काळात पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍याला अभ्यासपूर्ण आणि काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. भाजपकडे आपण उमेदवारीची मागणी केली असून, संधी मिळाली तर आपण पोटनिवडणूक लढवण्यास तयार आहोत. आपल्याला संधी मिळाली तर जनतेचा आपल्याला मोठा प्रतिसाद मिळेल, असे श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे सचिव, प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी सांगितले. 

प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले, अलीकडच्या काळात पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍याला दुर्दैवाने अभ्यासू आणि काम करणारे नेतृत्व मिळालेले नाही. निवडणुकीपुरती भाषणे आणि प्रश्न सोडवतो, असे सांगितले गेले. परंतु अभ्यास नसल्याने प्रश्न सुटू शकलेले नाहीत. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे जास्त बोलणाऱ्या नेतृत्वापेक्षा अभ्यास असलेल्या आणि काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. 

मंगळवेढा तालुक्‍यातील पाणी प्रश्नावर कितीतरी वेळा उहापोह झाला. जनतेची दिशाभूल करणारी मांडणी अनेक वेळा झाली. परंतु अभ्यास नसल्याने तो प्रश्न राजकीय मुद्दा म्हणूनच राहिला आणि तेथील जनतेला न्याय मिळाला नाही. पंढरपूरला आपण दक्षिणेची काशी म्हणतो, महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणतो; परंतु शिर्डी, शेगाव येथे ज्या पद्धतीने विकास झाला तशा पद्धतीने पंढरपूरचा विकास झालेला नाही. याची कारणे शोधण्याची गरज आहे. दिशा पकडून अभ्यासपूर्ण पद्धतीने काम केले तर पंढरपूर आणि मंगळवेढ्याचा निश्‍चितच विकास होऊ शकतो. 

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हे शैक्षणिक हब झाले आहे. तीन डीग्री इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा कॉलेज आहेत. त्यातून दरवर्षी हजारो तरुण पदव्या घेऊन पुणे, मुंबईला नोकरीच्या शोधात जात आहेत. या परिसरातील हुशार तरुणांना जर याच ठिकाणी नोकरी मिळाली, तर त्याचा विकासासाठी मोठा फायदा होईल. त्यासाठी पंढरपूरला एमआयडीसी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती बरोबरच अभ्यासपूर्ण मांडणी करणे आवश्‍यक आहे. त्या दृष्टीने पंढरपूर- मंगळवेढ्यासाठी मी योग्य उमेदवार ठरू शकतो. भाजपकडे आपण उमेदवारीची मागणी केली असून संधी मिळाली तर आपण चांगले काम करून दाखवू, असा विश्वास श्री. रोंगे यांनी व्यक्त केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT