Pawar_Kale. 
सोलापूर

सोलापुरात भाजपला मोठा धक्का ! पंढरपूरचे भाजपचे मोठे नेते कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : राज्यातील अनेक भाजप नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर असताना, आता पंढरपूरचे भाजप नेते तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

आज सरकोली (ता. पंढरपूर) येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि कल्याणाराव काळे एकाच मंचावर आले होते. 

या वेळी कल्याणाराव काळे यांनी "आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू' असं जाहीर वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्‍चत असल्याचे मानले जाऊ लागले आहे. 

(कै.) आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी शरद पवार आज (शुक्रवारी) सकाळी सरकोली येथे आले होते. या सर्व कार्यक्रमांना कल्याणराव यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. 

श्री. काळे या वेळी म्हणाले, मागच्या काळात दुष्काळ आणि आर्थिक मंदीमुळे साखर कारखाने अडचणीत होते. त्या वेळी पवार साहेबांनी पंढरपूरच्या तिन्ही साखर कारखान्यांना मोठी मदत केली आहे. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्यांचे धुराडे पेटले आहेत. आमच्यापण काही चुका झाल्या; परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल, चंद्रभागा आणि भीमा हे साखर कारखाने सुरू झाले आहेत. 

जाहीर सभेत कल्याण काळे यांनी, आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्‍चित मानला जात आहे. 

शरद पवार यांनीही आपल्या भाषणात, कल्याणाराव काळे यांना विश्वासात घेऊनच विठ्ठल कारखान्याची आर्थिक घडी नीट बसवू, असे सांगितल्याने तालुक्‍यात राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूसंपादनासाठी पालिकेकडून १३६ कोटींचा निधी, एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण होणार!

भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनांवर गंडांतर; चार हजार योजनांकडे १४८ कोटींची थकबाकी; आता कनेक्शन कापणार?

SCROLL FOR NEXT