In Pandharpur a father has tried to abuse his own daughter 
सोलापूर

पंढरपुरात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा ! स्वतःच्या मुलीवरच अत्याचाराचा प्रयत्न

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा वाईट हेतूने विनयभंग करून कू कर्म करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रूर बापाच्या विरोधात पिडीत मुलीच्या आईनेच फिर्याद दाखल केली आहे. ही धक्कादायक घटना पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

या प्रकरणी आरोपी कू कर्म करणाऱ्या जन्मदात्या बापाविरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी हा 2018 मधील मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून स्वतःच्या अल्पवयीन मुलीकडे वाईट  हेतूच्या नजरेने पाहून तीला दमदाटी व शिविगाळ करून तीचा वेळोवेळी विनयभंग करत होता. 3 फेब्रुवारी रोजी असाच हिडीस प्रकार स्वतःच्या मुलीसोबत करत असल्याचे पिडीत मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेवून आरोपी विरोधात फिर्याद दिली.

या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अलीकडेच पंढरपूर तालुक्यात चाॅकलेटचे आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता स्वतःच्या बापाचे कू कर्म समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. मोरे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Results 2026 : 'आम्हीच गोकुळचे मालक...' म्हणणाऱ्या विश्‍वास पाटील आणि अरुण डोंगळेंचा धक्कादायक पराभव; 3 दशकांची मक्तेदारी संपली, 'ते' वादग्रस्त वक्तव्य अंगलट

Latest Marathi News Live Update : आजच्या दिवशी एकमेकाला वाईट बोलण्याची भावना नसावी : जरांगे पाटील

Sambhajinagar Crime: अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पोलिसांची कारवाई; गावठी कट्टा, दोन काडतुसे जप्त, १.१२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

High Court: स्थानिकांना आंदोलनाचा त्रास नको, हायकोर्टाचे राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

Amravati News: अमरावतीत नवजात बाळाची साडेतीन लाखांत विक्री करण्याचा आरोप; महिला डॉक्टर पतीसह पसार

SCROLL FOR NEXT