In Pandharpur five patients were added on Monday bringing the total number of patients in the city to 35 
सोलापूर

पंढरपुरात सोमवारी पाच रूग्णांची भर; शहरातील एकूण रूग्णसंख्या 35 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहरातील आणखी 5 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या 35 वर पोचली आहे. आणखी 120 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी दिली. 
पंढरपूर शहरातील रोहिदास चौकातील तीन, मंदिर परिसरातील संत तुकाराम भवन जवळील एक, झेंडे गल्लीमधील एक अशा 5 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव आले आहेत. शहर व तालुक्‍यातील रुग्णांची संख्या 48 झाली. त्यापैकी 19 रुग्ण बरे झाले असून 28 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत शहर, ग्रामीण भाग आणि इतर तालुके आणि जिल्ह्यातून आलेल्या 55 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये शहरातील 35, ग्रामीण भागातील 14 आणि इतर जिल्हे व तालुक्‍यातून आलेल्या सात व्यक्तींचा समावेश आहे. 
सध्या उपचार सुरू असलेल्या 32 व्यक्तींमध्ये शहरातील 21, तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील 6 आणि इतर तालुके व जिल्ह्यांमधील पाच व्यक्तींचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या 189 लोकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत शहर व तालुक्‍यातील 1083 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 963 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून अद्याप 120 अहवाल प्रलंबित आहेत. आज (सोमवारी) करकंब येथे 4 आणि वाखरी येथील सेंटरमध्ये 56 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT