अटक sakal
सोलापूर

पंढरपूर : तोतया फौजदाराकडून फसवणूक

पंढरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा; एका संशयितास कोठडी

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : फौजदार असल्याचे खोटे सांगून पोलिस भरतीसाठी मदत करतो असे आमिष दाखवून एका मुलीस फसवल्याच्या कारणावरुन पोलिसांनी रमेश सुरेश भोसले ( वय २२, रा.आंबे ता.पंढरपूर) यास अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तालुक्‍यातील आंबे येथील आरोपी रमेश सुरेश भोसले याने पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या पंढरपूर शहरातील एका मुलीस आपण फौजदार असून आपले वडील आयपीएस अधिकारी आहेत असे सांगितले. पोलिस भरतीसाठी मदत करतो असे सांगून त्याने त्या मुलीशी आणि तीच्या घरातील लोकांशी संपर्क वाढवला आणि मुलीला लग्नासाठी तयार केले.

दरम्यान संबंधित मुलीला संशय आल्याने तीने मंगळवेढा आणि पंढरपूर पोलिस ठाण्यात चौकशी केली असता रमेश सुरेश भोसले यानावाचा कोणीही पोलिस अधिकारी दोन्ही पोलिस ठाण्यात कार्यरत नसल्याचे आढळले. तेव्हा या मुलीने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील निर्भया पथकातील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याकडे सॅक मध्ये खाकी रंगाचा पोलिसांचा गणवेष, बेल्ट, कॅप , खेळण्यातील पिस्तूल, बनावट ओळखपत्र सापडले. पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फौजदार प्रशांत भागवत पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Copper Theft: लोणी काळभोरमध्ये महावितरणच्या ६३० केव्हीए रोहित्रातील ४०० किलो तांब्याची चोरी; १.८० लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime: चांगल्या शाळेत घालतो सांगून १४ वर्षीय मुलीला मुंबईत आणलं, नराधम नातेवाइकानंच मुलीला वेश्याव्यवसायात अडकवलं

Pali Bypoll: पाली नगरपंचायत पोटनिवडणूक : प्रभाग 13 मध्ये 85.30 टक्के विक्रमी मतदान, महायुतीतील बिघाडीमुळे हायव्होल्टेज लढत

Latest Marathi Live Updates: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पोहोचले

Thane News: ठाणेकरांचे पाणी डेटा सेंटरच्या घशात! राष्ट्रवादीचा आरोप; अ‍ॅमेझॉनच्या प्रस्तावित प्रकल्पावरून वादंग

SCROLL FOR NEXT