Pandharpur Kartiki Ekadashi 
सोलापूर

कार्तिकीसाठी पंढरीत वैष्णवांची मांदियाळी

परतीचा पाऊस लांबल्याने वारकऱ्यांची संख्या घटली; फडणवीस यांच्या हस्ते पूजा

अभय जोशी

पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे चार ते पाच लाखाहून अधिक वारकरी येथे दाखल झाल्याने अवघी पंढरी भक्तीमय झाली आहे. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी आज तब्बल चौदा तास लागत होते. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा शुक्रवारी पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या दोघांचे आगमन पंढरपूरमध्ये आज झाले. यंदा परतीचा पाऊस लांबल्याने त्याचा यात्रेवर मोठा परिणाम झाला असून यात्रेकरुंच्या संख्येत लक्षणीय घट जाणवत आहे.

कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन विठुरायाच्या दर्शनाचे समाधान मिळवण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातून सुमारे सहा लाखाहून अधिक वारकरी दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी जागोजागी फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या शेकडो अनधिकृत फलकांमध्ये पुन्हा नव्याने आणखी शेकडो अनधिकृत स्वागत फलकांची भर पडली आहे.

अनेक दिवसांपासून रस्त्यांवर पडलेले खड्डे उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने बुजविले जात आहेत. एरवी एकादशी पूर्वी चार दिवस आधी यात्रेची तयारी पूर्ण होते. परंतु यंदा मात्र उपमुख्यमंत्री आज पंढरपुरात दाखल होणार असताना रस्ते दुरुस्तीचे काम आजही सुरुच होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai : "मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..."; निवृत्तीपूर्वी बीआर गवई काय म्हणाले? बाबासाहेबांचे मानले आभार, सर्वजण स्तब्ध!

जिला कधी अपमानित केलं… तीच ठरली जगाची राणी! मेक्सिकोची फातिमा बॉश मिस यूनिव्हर्स विजेती; भारताची मनिका ‘या’ क्रमांकावर

MP Nilesh Lanke: गड, किल्ल्यांसाठी विशेष निधी द्यावा: खासदार नीलेश लंके; महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन गरजेचं..

Australian Open Badminton 2025: लक्ष्य, आयुष उपांत्यपूर्व फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन, सात्त्विक-चिराग जोडीचीही वाटचाल

Latest Marathi News Live Update : किनवट नगरपालिका निवडणूकीत भाजप आणि ठाकरे सेनेत थेट लढत

SCROLL FOR NEXT