accident
accident  sakal
सोलापूर

Solapur : पंढरपूर-मल्हारपेठ महामार्ग; अपघातांचा ब्लॅक स्पाॅट बनला

सकाळ वृत्तसेवा

महूद - पंढरपूर-मल्हारपेठ महामार्गावरील चिकमहूद ते शेरेवाडी(ता.सांगोला) हा अपघातांचा ब्लॅक स्पाॅट बनला आहे.आज दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास शेरेवाडी(ता. सांगोला)येथे एसटी बस व व्हॅगनार गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती  गंभीर आहे.अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

आज रविवारी सकाळी अकरा वाजता सांगोला तालुक्यातील कटफळ शिवारातील शेरेवाडी येथे राज्य परिवहन महामंडळाच्या पाटण आगाराची पाटण-सोलापूर (एम.एच.१४, बी.टी.४१०५) ही बस व निमगाव(ता.माढा,जि.सोलापूर) येथील (एम.एच.४५, ए.एल.८०२२) या क्रमांकाची व्हॅगनार यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. 

व्हॅगनार गाडीतून आटपाडी(जि. सांगली) येथे विवाह सोहळ्यासाठी निघालेले व्हॅगनार चालक सोमनाथ गेनदेव शिंदे(वय ३५) व याच गाडीतील केदारी भागवत पाटील(वय ४५) हे दोघेजण जखमी झाले आहेत.यापैकी वाहन चालक सोमनाथ शिंदेे यांची प्रकृती गंभीर आहे.दोघा जखमींना स्थानिक नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.तिथेेेे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अपघातानंतर एसटी बसचेेे स्टेरिंग अडकल्याने एसटी तशीच पुढे फरपटत आली आहे.सुदैवाने एसटी मधील प्रवाशांना काहीही झाले नाही.मागील तीन-चार वर्षांपूर्वी पंढरपूर- मल्हारपेठ हा राज्यमहामार्ग नव्याने तयार करण्यात आला.

नव्याने रस्ता बनविल्यापासून सांगोला तालुक्यातील चिकमहूद ते शेरेवाडी हा वळणावळणाचा अपघातांसाठीचा ब्लॅक स्पाॅट बनला आहे.या सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर परिसरामध्ये आत्तापर्यंत असंख्य अपघात होऊन त्यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.या परिसरात सातत्याने अपघातांच्या मालिका सुरूच आहेत.

या मार्गावर असलेल्या वळणांच्या ठिकाणी गतिरोधक तयार करून अपघातांवरचा उपाय शोधण्याचा प्रयत्न संबंधित विभागाने केला आहे. मात्र तरीही अपघात थांबत नसल्याने या अपघातावर तांत्रिक उपाय शोधणे आवश्यक बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT