Pandharpur News Esakal
सोलापूर

Pandharpur News: दुर्दैवी! तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, पंढरपूरमधील घटना

Pandharpur News: खेळण्यासाठी बाहेर गेलेली मुलं संध्याकाळ झाली तरी घरी परतली नसल्याने त्यांच्या आईवडिलांनी शोध सुरू केला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंढरपुरातून एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे. दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात काल सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने करकंब गावात शोककळा पसरली आहे.(Latest Marathi News)

मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. गणेश नितीन मुरकुटे (वय 7 वर्ष), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय 8 वर्ष) आणि मनोज अंकुश पवार (वय 11 वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत. ही तीन लहान मुलं खेळत असताना शेततळ्यात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

खेळण्यासाठी बाहेर गेलेली मुलं संध्याकाळ झाली तरी घरी परतली नसल्याने त्यांच्या आईवडिलांनी शोध सुरू केला. त्यावेळी घराच्या जवळच असलेल्या परदेशी या शेतकऱ्याच्या शेततळ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले.(Latest Marathi News)

मुलांना तातडीने करकंब येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिन्ही मुलांना मृत घोषित केले. एकाच वेळी तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT