St Depot Pandharpur sakal
सोलापूर

ST Bus Service : एसटी बस सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांमधून समाधान

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही अज्ञात व्यक्तींनी सोमवारी भंडीशेगाव (ता.पंढरपूर) येथे एसटीची बस पेटवून दिली होती.

राजकुमार घाडगे

पंढरपूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी राज्य सरकारशी झालेल्या वाटाघाटी नंतर आपले आंदोलन २ जानेवारी पर्यंत मागे घेतले आहे. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाने एसटी बस सेवा शुक्रवारी (ता.३) सकाळपासूनच पूर्ववत सुरू केली आहे. दिवाळीच्या तोंडावर बससेवा सुरळीत झाल्याने प्रवाशामधून समाधान व्यक्त होत आहे.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही अज्ञात व्यक्तींनी सोमवारी भंडीशेगाव (ता.पंढरपूर) येथे एसटीची बस पेटवून दिली होती. त्यामुळे एसटी प्रशासनाने बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पंढरपूर बस आगारातून मागील काही दिवसांमध्ये एकही बस सोडण्यात आली नव्हती. परजिल्ह्यातून आलेल्या बसेस देखील पंढरपूर बस आगारामध्येच थांबवण्यात आल्या होत्या.

त्यामुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी एसटी बसने पंढरपूर मध्ये आलेले भाविक बस स्थानकामध्ये अडकून पडले होते. मात्र आता मराठा आंदोलन मागे घेण्यात आल्याने एस टी महामंडळाने आपली बस सेवा पूर्ववत सुरू केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी सेवा सुरळीत झाल्यामुळे प्रवाशामधून समाधान व्यक्त होत आहे.

मागील तीन दिवसांमध्ये एसटी बसेसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र आता मराठा आंदोलन मागे घेतल्याने शुक्रवारपासून एसटी सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.

- पंकज तोंडे, पंढरपूर बस स्थानक प्रमुख

आम्ही मागील शनिवारी नागपूरहून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो होतो. मात्र एसटी बस सेवा बंद असल्यामुळे पंढरपूर मध्येच अडकून पडलो होतो. आज बस सेवा सुरू झाल्यामुळे परतीच्या प्रवासाला निघालो आहोत.

- शहाजी मेंदेकर, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT