Pandharpur taluka also received rains the next day 
सोलापूर

पंढरपूर तालुक्‍यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा दणका 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (जि. सोलापूर) : पंढरपूर शहर व परिसरात आज रविवारी (ता. 19) दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे काढणीस आलेले द्राक्ष आणि बेदाण्याचे नुकसान झाले. सुस्ते (ता. पंढरपूर) येथील शेतकरी अनिल यादव यांच्या बेदाणा शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस व शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांनी केली आहे. 
शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यानंतर आज पहाटे पुन्हा अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, आंबा फळ पिकांसह गव्हू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी पहाटे कासेगाव, पुळूज, तुंगत, सुस्ते, टाकळी, भोसे या भागात जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका सुस्ते, भोसे भागात बसला आहे. 
सुस्ते येथील शेतकरी अनिल यादव यांच्या बेदाणा शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. जाधववाडी येथील शेतकरी युवराज घाटे या शेतकऱ्याचे बेदाण्याचेही नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे कासेगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या बागेत द्राक्षाचे घड तुटून पडले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

Manchar News : उसनवारीच्या धान्यावर भूक भागविण्याची वेळ; आंबेगाव तालुक्यात २२ शाळांचा पुरवठा रखडला

Power Shake-Up in Shirur: शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी गटाला तडे; शरद पवार गटाचे पाच नगरसेवक बाहेर पडल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता

PNG Connection : चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT