pandharpur taluka is free form corona due to thesupport given by all 
सोलापूर

सर्वांनी दिलेल्या मनापासून साथीमुळे पंढरपूर तालुका कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा

करकंब (ता.पंढरपूर) - गेल्या अडीच महिन्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईत समाजसेवी संस्थांपासून ग्रामस्तरीय समित्यांपर्यंत सर्वांनी मनापासून साथ दिल्याने पंढरपूर तालुका कोरोनामुक्त करण्यात यश आले असे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. 

तालुक्‍यातील जनतेने प्रशासनास केलेल्या सहकार्यामुळे एकही स्थानिक रुग्ण कोरोनाबाधित झाला नाही. मात्र परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांचा ओघ वाढल्यानंतर प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली. तालुक्‍यात आलेल्या सात हजार 393 व्यक्तींची वेळीच नोंद घेवून त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले. यातील संशयीत चाळीस जणाचे स्वॅब घेवून तपासणी केली. ह्या तपासणीमध्ये परजिल्ह्यातून आलेले सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. पण त्यांचा स्थानिक लोकांशी संपर्कच येवू दिला नसल्याने ही साखळी जागच्या जागी खंडीत करणे शक्‍य झाले. या कामी गावोगावी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समित्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. लॉकडाउन चालू झाल्यानंतर पंढरपूर शहरात परप्रांतिय साडेतीन हजार मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी शहरातील गणेश मंडळे, समाजसेवी संस्था व दानशूर व्यक्तिंना आवाहन केले. त्यांस श्री पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पंढरपूरवासियांनी उत्तम प्रतिसाद देताना तब्बल दोन महिने या मजुरांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. 

सध्या तालुक्‍यात एकही कोरोना रुग्ण नाही. शिवाय कोणाच्याही स्वॅबचे रिपोर्टही पेंडिंग नाहीत. लॉकडाउन शिथिल झाल्याने सर्व व्यवहार चालू झाले आहेत. अशा परिस्थितीत घरातील कर्ते पुरुष आता त्यांच्या कामाच्या ठिकाणी हजर होतील. काही ठिकाणी गर्दीही होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रत्येक कर्त्या व्यक्तीने काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे आपले कुटुंब धोक्‍यात येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. विशेष करुन सोलापूर शहरातील रेड झोनमधून कामानिमित्त विविध भागात जाणाऱ्या व्यक्तींनी आपल्यामुळे कोणी बाधित होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्यासोबतच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आदींनी उत्तम काम केले. पंढरपूर तालुक्‍यात सर्वच अधिकाऱ्यांची चांगली टीम जुळून आल्याचे त्यांनी नमूद केले. 


आता जबाबदारी आषाढी वारीची 
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यावर्षी आषाढी आहे. शासनस्तरावरुन वारीच्या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय घतले जात आहेत, पण विठ्ठलभक्तांच्या भावना लक्षात घेता यानिमित्ताने पंढरपूरात येणाऱ्या भाविकांना आवर घालतानाच येथील नियोजनावरही लक्ष्य केंद्रित करावे लागणार आहे. त्यामुळे आषाढी वारी कोरोनामुक्त पार पडेल यादृष्टीने आतापासून तयारी चालू केली आहे 
- सचिन ढोले, प्रांताधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Priya Nair: 92 वर्षांत पहिल्यांदाच महिला CEOची निवड; HULच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रिया नायर यांच्यावर

Video: दिल्ली पुन्हा 100 वर्ष मागे गेल्यासारखी दुरवस्था! पावसानंतरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

SCROLL FOR NEXT