संचारबंदीला पंढरपूर व्यापारी महासंघाचा विरोध ! Canva
सोलापूर

संचारबंदीला पंढरपूर व्यापारी महासंघाचा विरोध !आंदोलनाचा निर्धार

संचारबंदीला पंढरपूर व्यापारी महासंघाचा विरोध ! तीन दिवस आंदोलनाचा निर्धार

भारत नागणे : सकाळ वृत्तसेवा

उद्या (मंगळवारी) सकाळी छत्रपती शिवाजी चौकामध्ये घंटानाद आंदोलन केले जाणार आहे.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरसह (Pandharpur) सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) माढा (Madha), करमाळा (Karmala), माळशिरस (Malshiras) व सांगोला (Sangola) या पाच तालुक्‍यांमध्ये जिल्हा प्रशासनाने 13 ऑगस्टपासून संचारबंदी (Curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पंढरपूर व्यापारी महासंघाने (Pandharpur Vyapari Mhasangh) तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात भाजपचे (BJP) आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर व्यापारी महासंघाची बैठक झाली. या बैठकीमध्ये तीन दिवस जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन (Agitation) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या (मंगळवारी) सकाळी छत्रपती शिवाजी चौकामध्ये घंटानाद आंदोलन केले जाणार आहे.

कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात असलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील व्यापारी, व्यावसायिक व दुकानदार मेटाकुटीला आले आहेत. आषाढी वारीसह अनेक धार्मिक सोहळे रद्द करण्यात आल्याने अनेकांचा व्यवसाय बंद पडला आहे. त्यातच आता संचारबंदीचा आदेश काढण्यात आल्याने हातावरील पोट असलेल्या व्यावसायिक व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे 11 ऑगस्ट रोजी व्यापारी महासंघाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला जाणार आहे. 12 ऑगस्ट रोजी येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 13 ऑगस्ट रोजी पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी आपली दुकाने उघडी ठेवणार आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोना नियमांचे कडक निर्बंध लागू केले जात आहेत. त्यातच सातत्याने दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता 13 ऑगस्टपासून पंढरपूरसह पाच तालुक्‍यांमध्ये अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू केल्याने व्यापारी व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे आता व्यापारी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

बैठकीला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, सोमनाथ डोंबे, अप्पा मुचलुंबे, रा. पा. कटेकर, सचिन कारंडे, दत्ता लटके, कौस्तुभ गुंडेवार, रामकृष्ण वीर महाराज, अंबादास डांगे आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT