In Pandharpur, the wife has murdered her husband 
सोलापूर

अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीला संपवलं; पत्नी-प्रियकराला आजन्म कारावासाची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : अनैतिक संबंधास अडसर येणाऱ्या पतीचा खून करणारी पत्नी, तीचा प्रियकर आणि त्याचा मित्र अशा तीन जणांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बावीस्कर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील तिन्ही आरोपी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील आहेत.

या खटल्याची हकिगत अशी की, मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील सिध्दाप्पा धोंडाप्पा कोठे याचा 26 एप्रिल 2014 रोजी अज्ञात लोकांनी खून केला होता. या प्रकरणी मयत सिध्दाप्पा कोठे यांचे भाऊ रायाप्पा धोंडीबा कोठे यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एस.एस.चव्हाण आणि सहायक पोलिस निरीक्षक एस.एस.काळे यांनी केला. मयत सिध्दाप्पा कोठे याची पत्नी कमळाबाई हिचे आणि गावात राहणारा दिपक आण्णासाहेब मेटकरी याचे अनैतिक संबंध होते. त्या संबंधास सिध्दाप्पा अडसर करत होता म्हणून आरोपी दिपक मेटकरी याने त्याचा मित्र रामचंद्र म्हाळप्पा पेटरगे व कमळाबाई कोठे यांच्या मदतीने सिध्दाप्पा याच्यावर वार करुन त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. त्यावरुन पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

न्यायालयात घटनेच्या आदल्या दिवशी सर्व आरोपींना एकत्र पाहणारी मयताची मुलगी लक्ष्मीबाई अनिल मासाळ, फिर्यादी रायाप्पा कोठे, मयताचा मुलगा भपण्णा कोठे, मयताची आई सायव्वा कोठे, घटनेच्या वेळी मयतासह आरोपींना एकत्र पाहिलेला मलाप्पा तिपण्णा येडडे , शवविच्छेदन करणारे डाॅ.श्रीनिवास कोरुलकर तपासी अधिकारी श्री.चव्हाण आणि श्री.काळे आदींसह एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.

मयत सिध्दप्पा याचा मृत्यू अपघाती नसून तो सदोष मनुष्यवध असून पुरावा एकमेकाशी सुसंगत आहे असा यु्क्तीवाद सरकार तर्फे अॅड. सारंग वांगीकर यांनी केला. दोषारोपपत्रात आलेला पुरावा, साक्षीदारांच्या जबाबाचे अवलोकन करुन न्यायाधीश श्री.बावीस्कर यांनी आरोपी दिपक आण्णासाहेब मेटकरी, रामचंद्र म्हाळप्पा पेटरगे व कमळाबाई कोठे या तिन्ही आरोपींना आजन्म कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. टी.यु,सरदार आणि अॅड.दत्तात्रय यादव यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT