Leophard 
सोलापूर

सावधान..! मोहोळजवळच दिसला बिबट्या; नागरिकांना खबरदारीचा इशारा

चंद्रकांत देवकते

मोहोळ (सोलापूर) : मोहोळहून सोलापूरकडे जाणाऱ्या महामार्गापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर सीताराम गुरव यांच्या शेतामध्ये घर आहे. शेतामध्ये जनावरांच्या गोठ्याजवळच बांधलेल्या पाळीव कुत्र्याला भाकरी टाकण्यासाठी गुरुवारी (ता. 13) रात्री नऊच्या दरम्यान सीताराम गुरव व त्यांची पत्नी घराबाहेर आल्यानंतर समोरच लाईटच्या उजेडात पाण्याच्या हौदावर बसलेला बिबट्या सीताराम गुरव यांना व त्यांच्या पत्नीच्या नजरेस पडला. बिबट्या दिसताच सीताराम गुरव यांनी मोठ्याने ओरडताच बिबट्याने त्यांच्याकडे पाहात गुरगुरत धूम ठोकली. 

येथील शेतकरी सीताराम गुरव यांच्या शेतातील पाण्याच्या हौदावर गुरुवारी (ता. 13) रात्री नऊ वाजता बिबट्या आढळून आल्याची घटना घडली. या घटनेची माहिती "सकाळ'चे मोहोळ शहर प्रतिनिधी चंद्रकांत देवकते यांना देण्यात आली. श्री. देवकते यांनी तत्काळ वन अधिकारी जयश्री पवार यांना याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा वनरक्षक डी. डी. कांबळे यांच्याशी संपर्क झाला असता, त्यांनी शुक्रवारी सकाळी येतो, असे सांगत नागरिकांना घराबाहेर न पडता खबरदारी घेण्याबाबतच्या सूचना दिल्या. 

याबाबत पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना कल्पना देताच त्यांनी रात्रीच पोलिस व्हॅनद्वारे घटनास्थळावरून फेऱ्या मारत नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या. शुक्रवारी (ता. 14) सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी वनपाल डी. डी. साळुंखे व वनपाल डी. डी. कांबळे यांनी पाहणी केली असता, संबंधित ठसे हे बिबट्याचेच असल्याचे त्यांनी खात्रीलायक सांगितले. दोन दिवसांपूर्वी याच परिसरातील शिवाजी गुरव या शेतकऱ्याची बाहेर बांधलेली शेळी रात्री गायब झाली होती. दोन महिन्यांपूर्वी तालुक्‍यातील पाटकुल परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला होता. आता मोहोळ-सोलापूर महामार्गापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर व लोकवस्तीपासून अतिशय जवळच बिबट्याचा वावर आढळल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women World Cup : भारतीय महिला संघ सेमिफायनलमध्ये तर पोहोचला, पण सामना नेमका कधी अन् कुणाशी होणार? जाणून घ्या समीकरण...

एकदम क्यूट! शशांक केतकराच्या लेकीला पाहिलत? दिवाळीनिमित्त शेअर केला खास फॅमिली फोटो

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७व्या रोजगार मेळाव्यात ५१,०००हून अधिक युवकांना नियुक्तीपत्रे दिली

Piyush Pandey Death : 'अबकी बार, मोदी सरकार' या घोषवाक्याचे जनक पियुष पांडे यांचे निधन; कॅडबरी, फेविकॉल, एशियन पेंट्ससारख्या जाहिरातींना दिलं नवं रूप!

Jayant Patil : जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदललं, गोपीचंद पडळकरांच्या मतदार संघातील साखर कारखाना कमानीवर वेगळचं नाव...

SCROLL FOR NEXT