School 
सोलापूर

विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार ! सांगोल्यातील 1169 शिक्षक-कर्मचाऱ्यांची होणार "अँटिजेन' टेस्ट 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : राज्य शासनाच्या निर्णयानुसार सांगोला तालुक्‍यातील 76 शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सोमवारी (ता. 23) सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग, तालुका आरोग्य विभागाचे कर्मचारी व मुख्याध्यापक यांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील 76 शाळांमधील 687 शिक्षकांसह एकूण 1169 कर्मचाऱ्यांची अँटिजेन रॅपिड टेस्ट घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव यांनी दिली. मात्र शाळा सुरू झाल्या तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील का, याबाबत शंका आहे. 

मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सोमवार (ता. 23) पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळांना शाळा सुरू करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. 

तालुक्‍यातील 76 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय शिक्षकविणाऱ्या शिक्षकांची प्रथम अँटिजेन रॅपिड टेस्ट घेण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. 76 शाळांमधील नववी ते बारावीला शिकविणारे सुमारे 687 शिक्षक, 250 शिपाई, 21 ग्रंथपाल, 27 प्रयोगशाळा सहाय्यक, 44 प्रयोगशाळा परिचर व इतर 140 असे मिळून 1169 कर्मचाऱ्यांची कोरानाची तपासणी करण्यात येणार आहे. अँटिजेन रॅपिड टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर (घशातील स्वॅब) टेस्ट करणे बंधनकारक आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक-पालक यांची स्वतंत्र बैठक, पालकांचे संमतिपत्र, शालेय परिसर सॅनिटाईज करणे, मास्क, हॅंडवॉश आदी भौतिक सुविधा उपलब्ध करून फिजिकल डिस्टन्स पाळणे बंधनकारक असल्याने मुख्याध्यापकांची दमछाक होताना दिसत आहे. 

शाळेत विद्यार्थी पाठविण्यास बहुतांश पालकांचा नकार 
इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी पालकांचे संमतिपत्र आवश्‍यक आहे. कोरोनावर अध्यापही लस नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत बहुतांश पालकांनी "आम्ही मुलांना शाळेत लवकर पाठवणार नाही' असे "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT