KRUSHI VEEJ DHORAN.JPG 
सोलापूर

जिल्ह्यात कृषी वीज धोरण योजनेत पावणे दोन लाख शेतकऱ्यांचा सहभाग : 128 कोटीं रुपये जमा

प्रकाश सनपूरकर

 
सोलापूर ः जिल्ह्यात कृषी वीज धोरण योजनेत अर्ध्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला आहे. आतापर्यंत या शेतकऱ्यांनी 128 कोटी रुपयांच्या बिल रकमेचा भरणा केला आहे. योजनेचा प्रतिसाद वाढता असून अक्कलकोट व पंढरपूर तालुक्‍यातील वसुलीचा आकडा सर्वाधि आहे. 
कृषी वीज धोरण योजनेमध्ये शासनाने कृषी पंपाच्या थकबाकीवरील व्याज व दंडाची रक्कम आधी माफ केली आहे. त्यानंतर उर्वरीत थकबाकीच्या रकमेतील केवळ पन्नास टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरीत रक्कम माफ केली जात आहे. 
जिल्ह्यात या योजनेसाठी 3600 कोटी रुपयांची थकबाकी होती. या रकमेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी पन्नास टक्के म्हणजे 1800 कोटी रुपयांची थकबाकी भरण्याचे उद्दीष्ट आहे. योजना सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांनी योजनेला प्रतिसाद देण्यास सुरुवात झाली आहे. एकूण 3 लाख 68 शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत. त्यापैकी अर्ध्यापेक्षा अधिक म्हणजे 1 लाख 79 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे. 
योजना सुरु झाल्यापर्यंत 
या मोहिमेत वसूल रकमेपैकी 33 टक्के रक्कम ही स्थानिक गावातच वीज पुरवठा विकास सुविधासाठी वापरली जाणार आहे. तसेच 33 टक्के जिल्ह्याच्या वीज पुरवठा विकासकामासाठी वापरली जाणार आहे. या द्वारे जिल्ह्यात वसुल रकमेच्या नुसार उपकेंद्र, ट्रान्सफार्मर, नवीन विद्युत वाहिनी, उच्च दाब वाहिनी आदीची कामे करण्यासाठी अंदाजपत्रके केली जात आहेत. 

ठळक बाबी 
- योजनेसाठी पात्र शेतकरी 3 लाख 68 हजार शेतकरी 
- सहभागी झालेले शेतकरी 1 लाख 79 हजार शेतकरी 
- आतापर्यंत झालेली वसूली 128 कोटी रुपये 
- संपुर्ण थकबाकी नील करणारे शेतकरी 8437 
- योजना सहभागात चालू बिले भरण्याची अट 
- मार्च 2022 पर्यंत सहभागी होण्याची मुदत 


योजनेचा प्रतिसाद वाढता 
योजनेचा प्रतिसाद वाढतो आहे. पात्र शेतकऱ्यांच्या तुलनेत अर्धे शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांचा वीज बिल माफीचा लाभ देणारी ही योजना अत्यंत उपयुक्त 'ठरते आहे. 
- डी.एच. परळकर, अधिक्षक अभियंता, सोलापूर मंडळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या मुलाने दिली धक्कादायक कबुली... आई कुणाकडे पैसे द्यायची? उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले

Gold Rate Today: युद्धाचा परिणाम! सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ; पाहा ताजे भाव

Solapur Car Accident : पहाटे भीषण अपघात ! कार कॅनॉलमध्ये कोसळली, जावई बचावला मात्र पत्नीसह सासू-सासऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Latest Marathi News Live Update : साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

Good Friday 2026: आज 'हॅपी गुड फ्रायडे' का म्हणत नाहीत? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि इतिहास

SCROLL FOR NEXT