Ujani Dam esakal
सोलापूर

Ujani Dam : उजनी धरणाच्या पात्रात प्रवासी लॉन्च बुडाले; दुर्घटनेत अनेकजण बुडाल्याची भीती

आज (मंगळवार) सायंकाळी कळाशी येथून नागरिकांना घेऊन एक लॉन्च निघाली होती.

संतोष आटोळे

अचानक सुटलेल्या वादळाने नियंत्रण राखता न आल्याने लॉन्च बुडाल्याचे समजत आहे.

इंदापूर : उजनी धरणाच्या (Ujani Dam) पात्रात कळाशी ते कुगाव अशी वाहतूक करणारी एक लॉन्च आज सायंकाळच्या वेळी नदीपात्रात उलटल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या घटनेत काहीजण बुडाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चार जण बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूर (Indapur) तालुक्यातील कळाशी गावच्या हद्दीतून सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथे जाण्यासाठी उजनी पात्रात लॉन्चद्वारे वाहतूक केली जाते.

आज (मंगळवार) सायंकाळी कळाशी येथून नागरिकांना घेऊन एक लॉन्च निघाली होती. मात्र, अचानक सुटलेल्या वादळाने नियंत्रण राखता न आल्याने लॉन्च बुडाल्याचे समजत आहे. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ, महसूल विभागाचे व पोलीस दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचत आहेत, अशीही माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT