crime.jpg Gallery
सोलापूर

भोयरे शिवारात गळ्याला कोयता लावून पालघरच्या प्रवाशांना लुटले!

भोयरे शिवारात गळ्याला कोयता लावून पालघरच्या प्रवाशांना लुटले!

राजकुमार शहा

लघुशंकेसाठी थांबविलेल्या कारला सात जणांनी घेराव घालून कारमधील प्रवाशांना लाथा- बुक्‍क्‍यांनी व काठीने मारहाण केली.

मोहोळ (सोलापूर) : लघुशंकेसाठी थांबविलेल्या कारला सात जणांनी घेराव घालून कारमधील प्रवाशांना लाथा- बुक्‍क्‍यांनी व काठीने मारहाण (Crime) केली. गळ्याला कोयता व धारदार हत्यार लावून रोख रक्कम, मोबाईल व हातातील घड्याळ असा एकूण एक लाख 19 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना भोयरे (ता. मोहोळ) शिवारात गुरुवारी (ता. 16) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

या संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोलापूरहून कार (क्रमांक एम एच 02/ पीआर 5344) मधून नरखेड - भोयरे मार्गे कुवर मोहम्मद नादीर , नितीन पांचाळ व उमाशंकर बन्सराज यादव (चालक) (तिघे रा. उमेळे, ता. वसई, जि. पालघर) येथून तुळजापुरला देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांनी लघुशंकेसाठी कार भोयरे शिवारात उभी केली. त्या वेळी त्या ठिकाणी महिलांसह सात जणांनी कारला घेराव घालून कारमधील तिघांना लाथाबुक्‍क्‍यांनी व काठीने मारहाण केली. तसेच गळ्याला कोयता व धारदार हत्यार लावून त्यांच्याकडील रोख रक्कम, तीन मोबाईल व हातातील घड्याळ असा एकूण एक लाख 18 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच जाताना कारच्या काचा फोडून जिवे मारण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी कुवर मोहम्मद नादीर (रा. उमेळे) यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशुतोष चव्हाण हे करीत आहेत. दरम्यान, फिर्याद दाखल होताच पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस पथक तातडीने रवाना केल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT