लस घेतली अन्‌ अँटिजेन टेस्ट केली तरी कर्नाटकमध्ये नो एंट्री ! Canva
सोलापूर

लस घेतली अन्‌ अँटिजेन टेस्ट केली तरी कर्नाटकमध्ये नो एंट्री !

लस घेतली अन्‌ अँटिजेन टेस्ट केली तरी कर्नाटकमध्ये नो एंट्री !

राजशेखर चौधरी

महाराष्ट्र व कर्नाटक सीमा लागून असल्याने वागदरी, बळोरगी, मादन हिप्परगा, बोरोटी (माशाळ) सीमेवरून दररोज हजारो लोक ये- जा करतात.

अक्कलकोट (सोलापूर) : महाराष्ट्र राज्यातून (Maharashtra State) कर्नाटक राज्यात (Karnataka State) असलेल्या कलबुर्गी जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी हिरोळी सीमेवर बंदोबस्तास असलेले कर्नाटकचे पोलिस (Karnataka Police) हे प्रवाशांजवळ असलेले रॅपिड अँटिजेन टेस्ट प्रमाणपत्र व त्यांनी घेतलेले एक किंवा दोन्ही लसी काहीच कामाचे नाहीत असे स्पष्ट करीत आहेत. प्रवासी वर्गाकडे कोरोनाचे (Covid-19) फक्त आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर कर्नाटक हद्दीत प्रवेश मिळणार नाही, अशी अट घालत प्रवेश नाकारत असल्याने प्रवासी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. अत्यंत तातडीच्या कामांसाठी सुद्धा प्रवेश मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे.

अक्कलकोट तालुक्‍यातील (Akkalkot Taluka, Solapur) गावांचे कर्नाटकशी शेती, नोकरी, कौटुंबिक नातेसंबंध व सामाजिक ऋणानुबंध गेली कित्येक वर्षे कायम आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सीमा लागून असल्याने वागदरी, बळोरगी, मादन हिप्परगा, बोरोटी (माशाळ) सीमेवरून दररोज हजारो लोक ये- जा करतात आणि आता अचानक सीमा बंद करण्यात आली आहे. गुब्याड व हिंगणे या ठिकाणी तर पूर्ण रस्ते जेसीबी लावून बंद केले गेले आहेत. आता लोकांना आरटीपीसीआर सक्ती केली जाते. तसे न करता लस घेतलेल्यांना तसेच रॅपिड अँटिजेन प्रमाणपत्र सोबत असणाऱ्यांना सोडावे, असे प्रवाशांचे मत आहे. पण या ठिकाणी अडवून जाणूनबुजून थांबवून घेतले जाते आणि शेवटी पैसे देवाण- घेवाण होऊन गाड्या सोडल्या जातात, असे अनेक प्रवासी आपले मत व्यक्त करीत आहेत. आपल्याकडे आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर पाच- सहा दिवस रिपोर्ट येत नाही आणि अचानक आजारी व अन्य कारणाने कर्नाटक हद्दीत नातेवाइकांकडे जायचे झाल्यास काय करावे, हा प्रश्न सध्या उभा राहात आहे.

बसमध्ये आलात तर कोरोना नाही पण स्वतःच्या चारचाकीत कोरोना नक्की होणार!

गेल्या अनेक दिवसांपासून कलबुर्गीहून बस गाड्या हिरोळी सीमेपर्यंत येत आहेत. त्यातून प्रवासी खाली उतरतात व ते चालत तीनशे फूट पुढे महाराष्ट्र हद्दीत येऊन इकडच्या बाजूस उभे असलेल्या वागदरी सीमेवरील महाराष्ट्र बसमध्ये चढून अक्कलकोटकडे येतात. विनोदाचा भाग म्हणजे, त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्यांकडे कोणतेही कोरोना प्रमाणपत्र नसते तरी ते चालते. तसेच मादनहिप्परगा सीमेवरून बस गाड्या महाराष्ट्रात बिनधास्त येतात पण बाकीच्या सीमेवर बंदी केली जाते. यात सोलापूर प्रशासनाने कलबुर्गी प्रशासनाशी चर्चा करून हा प्रश्नी मार्ग लावावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT