Train_esakal. 
सोलापूर

चाकरमान्यांसाठी सुरू करा रेल्वेचे जनरल कोच ! खासगी वाहनांनी प्रवासामुळे बसतोय आर्थिक भुर्दंड 

विजय थोरात

सोलापूर : शहरातून विविध ठिकाणी नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र जनरल कोच बंद असल्यामुळे मासिक पासधारकांना खासगी वाहनांचा आधार घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंड बसत असून रेल्वे प्रशासनाने जनरल कोच सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी वाहतूक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

सोलापूर रेल्वे स्थानकावरून पुणे, विजयपूर, गुलबर्गा आदी ठिकाणी नोकरीनिमित्त अनेक कर्मचारी ये-जा करतात. कोरोनापूर्वी ते रेल्वेचा मासिक पास काढून जनरल कोचने प्रवास करीत होते. परंतु कोरोना महामारीमुळे रेल्वे बोर्डाने नियमित रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत. त्याऐवजी कोव्हिड स्पेशल नावाने रेल्वे गाड्या चालविण्यात येत आहेत. कोव्हिड विशेष रेल्वे गाड्यांना जनरल कोच नसल्याने मासिक पासधारकांची मात्र अडचण होत आहे. त्यामुळे त्यांना अधिक पैसे मोजून खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागत आहे. खासगी वाहनापेक्षा रेल्वेने प्रवास करून आपल्या कामाच्या ठिकाणी लवकर पोचता येते. जनरल कोच नसल्यामुळे पासधारकांच्या वेळेचे आणि पैशाचे नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित जनरल कोच सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून होत आहे. 

पार्किंगच्या कंत्राटदारालाही फटका 
जनरल कोच सुरू असताना मासिक पासधारक रेल्वे स्थानकावरील पार्किंगमध्ये आपली दुचाकी लावून बाहेरगावी जात होते. परंतु जनरल कोच बंद असल्यामुळे मासिक पासधारक पार्किंगमध्ये वाहने उभी करत नाहीत. याचा पार्किंगच्या कंत्राटदारालाही फटका बसला असून त्यांच्या दैनंदिन उत्पन्नावर परिणाम झाला आहे. 

रेल्वे विभागाने सोलापूरहून कोणत्याही गाड्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे मासिक पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि सोलापूरच्या खासदारांनी यासाठी रेल्वे बोर्डाकडे सोलापूर स्थानकावरील स्थानिक गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
- संजय पाटील, 
रेल्वे प्रवासी वाहतूक संघटना, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT