pathri solapur Lying on the farm Two with mother Chimukali Death sakal
सोलापूर

शेततळ्यात पडून आईसह दोन चिमुकलींचा मृत्यू! पाथरीतील घटना

शेतातील द्राक्ष बागेतील पाखरे हाकायला आईसह दोन चिमुकल्या मुली गेल्या होत्या

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : बागायती शेती, शेतात द्राक्ष बाग आणि त्या बागेला पाणी देण्यासाठी शेतात त्यांनी शेततळे तयार केले होते. शुक्रवारी (ता. 21) दुपारी दोनच्या सुमारास द्राक्ष बागेतील पाखरे हाकायला गेल्यानंतर आईसह दोन चिमुकलींचा त्या शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. अक्षय ढेकळे यांचे शेतातच घर असून त्यांची पत्नी सारिका अक्षय ढेकळे (वय 22), गौरी अक्षय ढेकळे (वय 4) आणि आरोही (वय 2) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्यात पाय घसरून मृत्यू झाला की त्यांनी मुलींसह आत्महत्या केली, याचा तपास तालुका पोलिस ठाणे करीत आहे.

शेततळ्यात पडून तिघांचा मृत्यू होण्याची ही जानेवारीतील दुसरी घटना आहे. मार्डी (ता. उत्तर सोलापूर) याठिकाणी काही दिवसांपूर्वी तीन मुलींचा पाय घसरुन मृत्यू झाला होता. त्यांनतर आता पापरी या गावात ही घटना घडली आहे. पापरी येथील दोन आणि चार वर्षांच्या मुलींसह त्यांच्या आईचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी त्यासंबंधीची सखोल चौकशी सुरु केली आहे. त्या तिघींचा पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला की त्यांनी आत्महत्या केली, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, शेतातील बागेत पाखरे राखायला गेल्यानंतर त्या तिघींचा मृत्यू झाल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. त्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात आणले आहेत. घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस पथक जाऊन पंचनामा करीत असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली. लोहारा तालुक्‍यातील नंदगाव हे मृत सारिका ढेकळे यांचे माहेर आहे.

पोलिस निरीक्षक म्हणाले...

- शेतातील द्राक्ष बागेतील पाखरे हाकायला आईसह दोन चिमुकल्या मुली गेल्या होत्या

- त्यांच्याच शेतातील शेततळ्यात पडून तिघींचा झाला मृत्यू

- तिघांचेही मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले शवविच्छेदनासाठी

- सखोल तपासाअंती समोर येईल मृत्यूचे नेमके कारण; पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test : भारतीय संघाचा ९२१ वा विजय... इंग्लंडशी बरोबरी अन् रवींद्र जडेजाने नोंदवले भारी पराक्रम, मोडला विराटचा विक्रम

प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची पत्रिका समोर; शंभूराजसोबत 'या दिवशी अडकणार लग्नबंधनात, शेअर केला व्हिडिओ

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

पिंजरा फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या कालवश; राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Latest Marathi News Live Update : नार्को टेस्ट करायला मी तयार आहे - रामदास कदमकदम

SCROLL FOR NEXT