Patient dies due to negligence of a doctor in a private hospital in Pandharpur 
सोलापूर

पंढरपुरात खासगी रूग्णालयातील डॉक्‍टरच्या निष्काळजीपणामुळे रूग्णाचा मृत्यू 

सुनील कोरके

भोसे (क), (ता. पंढरपूर, सोलापूर) : पायाच्या दुखण्यामुळे आजारी वडिलांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव गेला असून संबंधित डॉक्‍टरवर गुन्हा दाखल करावा, अशा आशयाची फिर्याद अविनाश विष्णू ढेकळे यांनी पंढरपूर पोलिस ठाण्यात दिली आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्‍यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

पंढरपूर येथील विष्णू बलभीम ढेकळे यांना पंढरपुरातीलच निकम हॉस्पिटलमध्ये पायाच्या दुखण्यामुळे ता. 21 ऑक्‍टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांच्या चार व पाच नंबरच्या माणक्‍यामध्ये गॅप पडला असून त्याचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना कायमचे अपंगत्व येईल, असे डॉक्‍टरकडून सांगण्यात आले. त्यानंतर ता. 25 ऑक्‍टोबर रोजी त्यांच्यावर मणक्‍याची शस्त्रक्रीया करण्यात आली. शत्रक्रियेनंतर ते शुद्धीवर आलेच नाहीत. सदर रुग्णालयात ऑक्‍सिजनची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना त्याच डॉक्‍टरांनी दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. त्यानंतर ता. 27 ऑक्‍टोबर रोजी त्यांचे निधन झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. एस.टी. महामंडळात कर्मचारी असलेले ढेकळे यांचे पश्‍चात पत्नी व दोन मुले असून त्यांचा संसार उध्वस्त झाला आहे. सदर डॉक्‍टरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. 

मयत रूग्णाची पत्नी मनीषा ढेकळे म्हणाल्या, डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे. माझी लहान दोन मुले शिक्षण घेत आहेत. पतीच्या निधनाने माझा संसार उध्वस्त झाला आहे. आता मी माझ्या मुलांचे शिक्षण व संगोपन कशी करू? माझ्या पतीच्या मृत्यला जबाबदार असणाऱ्या डॉक्‍टरवर कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरून माझ्यासारखे इतरांचे संसार उध्वस्त होणार नाहीत. 
निकम हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत निकम म्हणाले, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याची सर्व कागदपत्रे कमिटीकडे दिली आहेत. त्याबाबत कमिटीच निर्णय देईल. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT