Permission for groceries and vegetables in rural areas from 6 am to 1 pm 
सोलापूर

जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश... ग्रामीण भागातील किराणा, भाजीपालासाठी सकाळी ६ ते दुपारी एक वाजेपर्यंत परवानगी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज (सोमवारी) सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी सुधारित आदेश काढला आहे. या आदेशानुसार आता ग्रामीण भागातील किराणा दुकान व बेकरी (केक शॉप वगळून) फळे व भाजीपाला सकाळी सहा ते दुपारी एक, दूध विक्री व वितरण सकाळी सहा ते सकाळी दहा, पेट्रोल पंप सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत सुरू ठेवण्यास त्यांनी परवानगी दिली आहे. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रांताधिकारी यांनी जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात सर्व दुकाने, व्यापारी आस्थापना, उद्योग, कार्यालय सुरू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील रास्त भाव धान्य दुकाने नियमित वेळेत सुरू राहणार आहेत. अंडी, मांस, मासे इत्यादींची दुकाने सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत सुरू राहणार आहेत. खते, कीटकनाशके, बियाणे विक्री इत्यादी बाबीची व कृषी विषयक दुकाने सकाळी सहा ते बारा पर्यंत सुरु राहणार आहेत. सर्व बँकांमधील कामकाजाची वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीसाठी निश्चित करण्यात आली आहे. बाजार समित्यांमधील फळे, भाजीपाला लिलाव बंद राहतील.  किरकोळ विक्रेते यांना भाजीपाला व फळे खरेदी करता येणार आहेत. या नवीन आदेशामध्ये गटागटाने फिरणे, उभा राहणे सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक जास्त व्यक्तींनी एकत्रित येणे यासाठी मनाई करण्यात आली आहे. 17 मे पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT