Permission to start this shops in Solapur in lockdown 
सोलापूर

चौथ्या लॉकडाऊनमध्ये सोलापुरात 'ही' दुकाने सुरु करण्यास परवानगी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लॉकडाउननंतर प्रथमच शहरातील स्टेशनरी व बेकरीची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्टेशनरी दुकानासाठी सकाळी 7 ते 12 तर बेकरीसाठी सकाळी 7 ते 11 अशी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोमवारी (ता. 18) नवे आदेश काढले.
सर्वसामान्य खातेदारांसह अन्य खातेदारांची सोय व्हावी या हेतूने शहरातील बँका सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शहरातील एटीएम पूर्णवेळ सुरूच राहणार असून दवाखाने व औषध विक्री त्यांना नेमून दिलेल्या वेळेनुसार सुरू राहतील, असेही पोलीस आयुक्त शिंदे यांनी या आदेशानुसार स्पष्ट केले आहे. या दुकानांना सुरु करण्यास परवानगी दिली आहे, त्यांनी सोशल डिस्टन्स यासह अन्य नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.

परवानगी देण्यात आलेल्या व्यवसायांची वेळ

- सकाळी 7 ते 11 : भुसार मालाची घाऊक विक्री, किराणा दुकाने, भाजीपाला विक्री घरपोच भाजीपाला विक्री, अंडी, मटन, मांस विक्री, बेकरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू जिल्ह्यातील गोडाऊन म्हणून मधून वितरण (परवाना बंधनकारक)
- सकाळी 6 ते 11 : दूध विक्री व वाटप
- सकाळी 6 ते 9 : कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व फळे विक्री
- सकाळी 7 ते दुपारी 2 : स्टेशनरी व रेशन दुकाने
- सकाळी 9 ते दुपारी 2 : बँक
- सकाळी 7 ते रात्री 7 : खते व बियाणे, कीटकनाशके, कृषी यंत्रांचे सुटे भाग विक्री, शेतीसाठी लागणारी उपकरणे भाड्याने देणे, रेस्टॉरंटमधून घरपोच सेवा
- सकाळी 7 ते दुपारी 2 : गॅस वितरण होम डिलिव्हरी गॅस वितरण होम डिलिव्हरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT